10 वी परीक्षा घेणं शक्य नाही, राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

मुंबई उच्च न्यायालयात उद्या होणाऱ्या सुनावणीत राज्य सरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे.

10 वी परीक्षा घेणं शक्य नाही, राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर
परीक्षा फाईल फोटो
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 10:51 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे 10 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलं आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला होता. तसंच आपली बाजू मांडण्याचे आदेशही शिक्षण विभागाला दिले होते. त्याबाबत राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. 10 वी परीक्षा घेणं शक्य नसल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येणार आहे. (Maharashtra Government will file an affidavit in the Mumbai High Court)

महाराष्ट्र सरकारने दहावीची परीक्षा (SSC exam 2021) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच घेतला आहे. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मुलांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे. तर इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 100 गुणांची असेल. ती OMR पद्धतीने घेतली जाईल. त्यासाठी दोन तासांचा अवधी दिला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

दहावीचा निकाल कसा लावणार?

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व 10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट 2021 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी 10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे. i. विद्यार्थ्यांचे 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण ii. विद्यार्थ्यांचे 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण iii. विद्यार्थ्यांचा 9 वी चा अंतिम निकाल 50गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

शासनाकडून जीआर जारी

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने दहावी एसएससी परीक्षेसदंर्भात शासन निर्णय काढला आहे. दहावीच्या परीक्षांचा निकाल लावण्यासाठी निकष आज जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठं आव्हान निर्माण झालं होतं. ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण गेले वर्षभर सुरू होतं. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. गतवर्षी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे नववीच्या मुलांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पालक, मुख्याध्यापक यांच्याशी 24 बैठका घेण्यात आल्या, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी : दहावीचा निकाल जूनमध्ये, नववी-दहावीच्या अभ्यासक्रमावरुन मूल्यांकन, 11 प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

दहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

Maharashtra Government will file an affidavit in the Mumbai High Court

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.