अकोल्यात एकाच दिवसात कोरोनाचे 11 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 75 वर
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात (Akola Corona Patient) आहे.
अकोला : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात (Akola Corona Patient) आहेत. अकोला जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 11 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून (Akola Corona Patient) मिळाली आहे.
दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने अकोला जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोल्यात आज कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी चार रुग्ण मोहम्मद अली रोड, दोन बैदपुरा, इतर गुलजारपुरा, खगणपुरा, कुर्षीनगर, ताजनगर येथील असून 1 बार्शीटाकली तालुक्यातील पिंजर येथील आहे.
अकोल्यात आज 11 कोरोना रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या 75 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 13 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत. 55 कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अकोल्यात आतापर्यंत एकूण सहा लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एका रुग्णाने आत्महत्या केली.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत 14 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 583 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 2465 रुग्ण कोरोनामुक्त झालेले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
हिंगोलीत ‘कोरोना’ रुग्णसंख्येचा स्फोट, 24 तासात 37 SRPF जवानांना लागण, रुग्णसंख्या 90 वर
भारतात 24 तासातील सर्वाधिक रुग्णसंख्या, 3900 नवे कोरोनाग्रस्त, 195 कोरोनाबळी