11th Class Admissions| राज्यात अकरावी प्रवेशासाठी आता वेटिंग लीस्ट, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी बंद

दहावीच्या निकालानंतर सुरु झालेली प्रवेश प्रक्रिया अकरावीच्या प्रथम सत्रापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. दरवर्षी प्रतम येणाऱ्यास प्रादान्य फेरीतील दहा ते बारा राऊंडमुळे ही प्रवेश प्रक्रिया दिवाळी सुट्टीनंतरही सुरु राहते. मात्र यंदा प्रक्रिया लवकरात लवकर आटोपण्याचा निर्णय शिक्षण विभागावने घेतला आहे.

11th Class Admissions| राज्यात अकरावी प्रवेशासाठी आता वेटिंग लीस्ट, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी बंद
सांकेतिक छायाचित्र Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 10:13 AM

मुंबईः राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका (Municipal corporation) क्षेत्रात यंदा अकरावीचे प्रवेश (11th class admission) ऑनलाइन पद्धतीनेच होती. मात्र या वर्षी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही फेरी बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी प्रतीक्षा यादी (Waiting list) पद्धत राबवण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित प्रवेश फेऱ्या आमि एक विशेष फेरी यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा या वेटिंग लीस्टमध्ये क्रकांक लागेल. त्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.

अशी असेल प्रक्रिया-

2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची सुरुवात येत्या 01 मे पासून होणार आहे. 01 ते 14 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सराव करता येईल. तसेच 17 मे पासून ते दहावीचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी, अर्जाचा भाग 01 भरणे, अर्ज प्रमाणित करून व्हेरिफाय करता येईल. तसेच दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश अर्जाचा भाग 02 भरणे आणि पसंतीक्रम नोंदवता येईल. यंदा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी बंद करून त्याऐवजी वेटिंग लीस्ट पद्धत राबवली जाईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले. प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधील शिल्लक जागेवर गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेश अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक असे (दहावीच्या निकालानंतर)-

– अर्जाचा भाग 02 भरणे, पसंतीक्रम नोंदवणे- पाच दिवस – कोट्याअंतर्गत प्रवेश – पाच दिवस – नियमित फेरी – 01- 10 ते 15 दिवस – नियमित फेरी 2- 7 ते 9 दिवस – नियमित फेरी 3- 7 ते 9 दिवस – विशेष फेरी- 7 ते 9 दिवस (आरक्षण नाही) प्रतीक्षा यादीतील प्रवेश- प्रवेश पूर्ण होईपर्यंत

प्रथम सत्रापर्यंत प्रवेश प्रक्रिया

दरम्यान, दहावीच्या निकालानंतर सुरु झालेली प्रवेश प्रक्रिया अकरावीच्या प्रथम सत्रापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. दरवर्षी प्रतम येणाऱ्यास प्रादान्य फेरीतील दहा ते बारा राऊंडमुळे ही प्रवेश प्रक्रिया दिवाळी सुट्टीनंतरही सुरु राहते. मात्र यंदा प्रक्रिया लवकरात लवकर आटोपण्याचा निर्णय शिक्षण विभागावने घेतला आहे. तसेच ज्या कॉलेजमधील प्रवेश पूर्ण होतील, तेथील शिक्षण प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात येतील.

इतर बातम्या-

नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यात दोन तरुण बुडाले

Gautam Adani: 2 वर्षात 300 टक्क्यांनी संपत्तीत वाढ! जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनण्यासाठी गौतम अदानी सज्ज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.