विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार, कोणाचा उमेदवार पडणार?

विधान परिषदेवर अखेर पंकजा मुंडेंना भाजपनं संधी दिली आहे. पण विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे नेमका कोणाचा उमेदवार पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार, कोणाचा उमेदवार पडणार?
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 9:10 PM

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं 5 उमेदवारांची यादी जाहीर केलीये. त्यात पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं त्यांची आमदारकी निश्चित झाली. मात्र महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिल्यानं आता 1 उमेदवार कोणाचा पडणार ? याकडे नजरा आहेत.

महायुतीच्या वाट्याला 9 जागा येत असून भाजपच्या कोट्यातून सर्व पाचही उमेदवार भाजपनं जाहीर केले. ज्यात पंकजा मुंडेंचं नाव पहिलं आहे. पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा भाजपनं आपल्या कोट्यातून संधी दिलीये. विशेष म्हणजेच पंकजा मुंडेंच्याच नावाकडे नजरा होत्या आणि पंकजांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी देवून राजकीय वनवास संपवलाय.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये प्रितम मुंडेंचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवलं होतं. पण पंकजा यांचं लोकसभेतही शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंनी पराभव केला. मात्र आता त्यांचा विधान परिषदेवर आमदारकीचा मार्ग मोकळा झालाय.

शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही 2-2 उमेदवार दिले जाणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेकडून निलम गोऱ्हे आणि भावना गवळींना संधी मिळेल हे निश्चित झालं आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. शिवाजीराव गर्जेंच्या नावावरुन रोहित पवारांनी जोरदार टीका केलीये.

महाविकास आघाडीचा विचार केला तर शरद पवारांची राष्ट्रवादी शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा देणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसनं प्रज्ञा सातवांना उमेदवारी दिली आहे.

विधानसभेच्या आमदारांच्या संख्याबळावर 11 जागेसाठी 12 उमेदवार झालेत. त्यामुळं निवडणूक होणार हे निश्चित. आता कोणाचा उमेदवार पडणार हे पाहावं लागेल.

Non Stop LIVE Update
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.