जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 174 वर, अंमळनेर शहरात शंभरीपार रुग्ण
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अगदी कमी रुग्ण असलेल्या जिल्ह्यात अचानक शंभरी पार करत 174 रुग्ण आढळले (Corona Patient increase in Jalgaon) आहेत.
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अगदी कमी रुग्ण असलेल्या जळगाव जिल्ह्यात अचानक शंभरी पार करत 174 रुग्ण आढळले (Corona Patient increase in Jalgaon) आहेत. कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या अंमळनेर शहरात तर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. सद्यस्थितीत अंमळनेरात 104 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीला नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि प्रशासनाने केलेले दुर्लक्ष जबाबदार असल्याचे आरोप करण्यात (Corona Patient increase in Jalgaon) येत आहेत.
“जिल्ह्यात कोरोनाने भीषण रूप धारण केले असून आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यामुळेच अंमळनेरातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे”, असा आरोप विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांनी केला आहे.
“अंमळनेर शहरात सुरुवातीला साळीवाडा भागातील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली. या दाम्पत्याचा मुलगा पुण्याहून घरी आलेला होता. परंतु प्रशासनाच्या चुकीच्या निदानामुळे आज पूर्ण अंमळनेर शहरात कोरोना वाढला आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर एवढी बिकट परिस्थिती ओढवली नसती”, असेही आमदार वाघ म्हणाल्या.
शहरातील अचानक वाढलेल्या आकडेवारीमुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अंमळनेर शहराचे आमदार अनिल भाईदास पाटील आणि सर्व अधिकारी यांच्या बैठका सुरू असून या भीषण परिस्थितीवर कशी मात करावी याबाबत चर्चा सुरू आहे. अंमळनेरातील नागरिकांनी देखील शहरात कडकडीत बंद पाळला असून नागरिकांनी घराबाहेर निघू नये म्हणून आमदार पाटील स्वतः आपल्या गाडीतून शहरात फिरत असून सर्व नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.
अंमळनेर शहरात पाहिले रस्ते बांबूने बंद केले होते. आता मात्र लोखंडी पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत. अंमळनेर शहर हे पूर्णपणे सील करण्यात आले आहे. तसेच आमदार पाटील यांच्यातर्फे पीपीई किटसाठी 25 लाख रुपये देण्यात आले असून 21 शासकीय आणि खाजगी डॉक्टर त्यांचे सहकारी यांची टीम पूर्ण अंमळनेर शहराची तपासणी करत आहे. आज अंमळनेर शहरात बंदचा चौथा दिवस असून आम्ही लवकरच कोरोनावर मात करू असे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून अजून कोरोनाची तपासणी करणारी प्रयोगशाळा जिल्ह्यात तयार करण्यात आलेली नाही. अंमळनेर शहराची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. मात्र, अजूनही या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्यात प्रशासनाचे प्रयत्न कमी पडत आहेत. दुसरीकडे, राज्य सरकार देखील कोरोनाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करत असल्याचे सांगत आहे. परंतु, राज्य सरकारच्या उपाययोजना स्थानिकांपर्यंत पोहोचत नसल्याची स्थिती आहे.
संंबंधित बातम्या :
जळगावला कोरोनाचा विळखा, कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी चौघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित, रायगड पुन्हा रेड झोनमध्ये