AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad : समुद्राला पावसाळ्यात 22 दिवस उधाण, सर्वात मोठी येणार भरती, सतर्क रहाण्याचे शासनाचे अवाहन

अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. या वर्षी तब्बल 22 दिवस समुद्राला उधाण येणार असल्याची आकडेवारी शासनाने जाहीर केली आहे .

Raigad : समुद्राला पावसाळ्यात 22 दिवस उधाण, सर्वात मोठी येणार भरती, सतर्क रहाण्याचे शासनाचे अवाहन
समुद्राला उधाण येणारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 2:36 PM

रायगड : अवघ्या काही दिवसांवर पावसाळा (rainy season) येऊन ठेपला आहे. या वर्षी तब्बल 22 दिवस समुद्राला (Sea) उधाण येणार असल्याची आकडेवारी शासनाने (government) जाहीर केली आहे . या मध्ये 16 जून आणि 15 जुलै रोजी सर्वात मोठी म्हणजे 4 . 87 मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यावेळी स्थानिकांनी आणी पर्यटकानी समुद्र किनारी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या वर्षी जून-जुलै प्रत्येकी सहावेळा तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्रत्येकी पाचवेळा समुद्राला उधाण येणार आहे. या वर्षी एकूण अठरा दिवस हे उधाण रहाणार आहे. तर या दिवशी समुद्र किनारी पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे समुद्र किनारी जे लोक राहत असतील त्यांनी सुरक्षेसाठी वरील तारखांना सुरक्षित स्थळी रहावे, असं आवाहन करण्यात आलंय.

सतर्क रहा!

मुंबईत समुद्राला उधाण असताना प्रचंड उंच लाटा किनाऱ्यावर आदळतात. साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांपासून धोका होऊ शकतो. याचवेळी अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी समुद्रात जाण्यापासून रोखले गेल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. असं उधाण धोकादायक असल्याने प्रशासनाकडून वेळोवेळी सतर्क केलं जातं. त्यामुळे प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे आणि धोका टाळावा.

यावर्षी उधाण कधी?

या वर्षी जून-जुलै प्रत्येकी सहावेळा तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्रत्येकी पाचवेळा समुद्राला उधाण येणार आहे. या वर्षी एकूण अठरा दिवस हे उधाण रहाणार आहे. तर या दिवशी समुद्र किनारी पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या तारखा

16 जून आणि 15 जुलै रोजी सर्वात मोठी म्हणजे 4 . 87 मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे या तारखेला समुद्र किनाऱ्याजवळ न जाता सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन केलं जातंय. या काळात समुद्र किनाऱ्याजवळ राहणं धोकादायक आहे. कारण, समुद्राच्या लाटा मोठ्या असतात. लोक या काळात मुद्दामहून समुद्रकिनारी जातात. पण, प्रशासनाने केलेल्या आवाहनाचं पालक करावं, समुद्राच्या ठिकाणी 16 जून आणि 15 जुलै या काळात जाऊन नये. कारण, या तारखेदरम्यान सर्वात मोठं उधाण येणार असल्याची माहिती आहे. साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांपासून धोका होऊ शकतो. याचवेळी अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी समुद्रात जाण्यापासून रोखले गेल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे सुरक्षितस्थळी राहून सतर्क रहावे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. या तारखेला कुणी समुद्रकिनारी जात असल्यास त्यालाही रोखावं.

जून महिन्यातील धोक्याचे दिवस (दिनांक, वेळ, लाटांची उंटी)

  1. 13 जून 11.08 4.56 मीटर
  2. 14 जून 11.56 4.77 मीटर
  3. 15 जून 12.46 4.86 मीटर
  4. 16 जून 13.35 4.87 मीटर
  5. 17 जून 14.25 4.80 मीटर
  6. 18 जून 15.16 4.66 मीटर

जुलै महिन्यातील धोक्याचे दिवस (दिनांक, वेळ, लाटांची उंटी)

  1. 13 जुलै 11.44 4.46 मीटर
  2. 14 जुलै 12.33 4.82 मीटर
  3. 15 जुलै 13.22 4.87 मीटर
  4. 16 जुलै 14.08 4.85 मीटर
  5. 17 जुलै 14.54 4.73 मीटर
  6. 18 जुलै 15.38 4.51 मीटर

इतर बातम्या  

Bhonga: आता थिएटरमध्येही वाजणार ‘भोंगा’; मनसेकडून पत्रकार परिषदेत घोषणा

Amravati | पिसाळलेला कुत्रा शोधा, 1 लाखाचं बक्षीस मिळवा; अमरावतीत बळवंत वानखडेंनी कुणावर केली बोचरी टीका?

‘या’ आहेत भारतातील, सर्वात सुरक्षित कार: यांना मिळाले ‘क्रॅश चाचणी’ त 5 स्टार रेटिंग !

'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.