महाराष्ट्रात आतापर्यंत 7 पोलीस अधिकारी आणि 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात (Corona virus maharashtra police) आली आहे.
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात (Corona virus maharashtra police) आली आहे. याच दरम्यान कोरोनाचा शिरकाव आता महाराष्ट्रातील पोलीस विभागातही झाला आहे. 23 मार्चपासून ते आतापर्यंत महाराष्ट्रातील एकूण 23 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली (Corona virus maharashtra police) आहे.
कोरोना विषाणूच्या लढाईत सध्या डॉक्टर, नर्स, बीएमसी कर्मचारी आणि पोलीस महत्त्वाची भूमीका बजावत आहेत. तसेच मुंबईतील 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रात 23 मार्चपासून आतापर्यंत एकूण 23 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 7 पोलीस अधिकारी आहेत. तर 16 पोलीस शिपाई आहेत. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण 86 पोलीस क्वारंटाईन आहेत.
Till now, 23 police personnel in Maharashtra have tested positive for Coronavirus.
— ANI (@ANI) April 16, 2020
महाराष्ट्रात काल एका दिवसात 286 कोरोना रुग्ण
महाराष्ट्रात काल (16 एप्रिल) एकूण 286 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3202 वर पोहोचली आहे. तर मुंबईत काल एका दिवसात 177 नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 2073 वर येऊन पोहोचली आहे.
पोलीस विभागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने गृहविभागात सर्वत्र खबरदारी बाळगण्यात येत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलीस सध्या महत्त्वाची भूमीका बजावत आहे. पण याच पोलिसांना कोरोनाची लागण होत आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत देशात 12 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात 2 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.