AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2022: मनुष्यबळ विकासासाठी 46,667 कोटी, अजितदादांची मोठी घोषणा

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पातून अजितदादांनी विकासाची पंचसूत्री मांडली आहे. या पंचसूत्रीनुसार कृषी व संलग्न बाबींसाठी 23, 888 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Budget 2022: मनुष्यबळ विकासासाठी 46,667 कोटी, अजितदादांची मोठी घोषणा
मनुष्यबळ विकासासाठी 46, 667 कोटी, अजितदादांची मोठी घोषणाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 5:10 PM

मुंबई: अर्थमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांनी आज 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) आज सादर केला. या अर्थसंकल्पातून अजितदादांनी विकासाची पंचसूत्री मांडली आहे. या पंचसूत्रीनुसार कृषी व संलग्न बाबींसाठी 23, 888 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी 5244 कोटी, मनुष्यबळ विकासासाठी 46, 667 कोटी, दळणवळणासाठी 28, 605 कोटी आणि उद्योगासाठी 10, 111कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 1, 15, 215 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत. यंदा राज्य सरकारने (maharashtra government) आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींची तरतूद केली आहे. तसेच कर्करोग व्हॅनसाठी 8 कोटींची तरतूद केली आहे. तसेच हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड आदी 16 जिल्ह्यात प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

मनुष्यबळ विकास विकासासाठी घशघशीत तरतूद

  1. 1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ई शक्ती योजनेतून मोबाईल सेवा देणार
  2. बालसंगोपनाच्या निधीत 1125 रुपयांवरुन 2500 रूपयांपर्यंत अनुदानात वाढ
  3. प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारणार.
  4. नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्रे सुरु करणार.
  5. शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्‍सींग मशिन

इतर विशेष तरतूद

  1. कलिना विद्यापीठात स्व. लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय. 100 कोटींची तरतूद
  2. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेच्या इमारतीसाठी डीपीडीसी मधील 5 टक्के निधी राखीव
  3. गतिमान वाहतूक व दळणवळन साठी 6 हजार किलोमीटरपेक्षा अधिक रस्ते बांधकाम
  4. एमएमआरडीएमधील वाहतूक ताण कमी करण्यासाठी योजना
  5. अमरावती व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ वरून रात्रीची वाहातूक सेवा सुविधा तयार करण्यात येणार
  6. गडचिरोली येथे नवीन विमानतळ विचाराधीन
  7. इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 पर्यंत 10 टक्के वाहनां उद्दिष्ट
  8. कोविडमध्ये विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी नवी योजना
  9. शिवभोजन योजना.
  10. सैन्यदल रुग्णालयाच्या धर्तीवर पोलीस रुग्णालय गडचिरोली येथे निर्माण करणार
  11. मराठी भाषा भवन साठी 100 कोटी
  12. मुंबईत महाराष्ट्र भवन उभारणार

संबंधित बातम्या:

Maharashtra Budget : कोरोनानं महाराष्ट्राचा कणा ढिला केला, आरोग्य योजनांसाठी 10 मोठ्या घोषणा कोणत्या?

Maharashtra Budget Session 2022: ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये बळीराजा केंद्रस्थानी, शेती समृद्धीसाठी अजित पवारांच्या मेगा प्लॅनमधल्या 10 मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प सादर

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.