पाण्याच्या प्रवाहात पाच मायलेकं एकमेकांना घट्ट बिलगले, एक लाट आली अन्… बघे नुसते पाहत होते, ते मात्र जीवानीशी गेले

लोणावळ्याच्या प्रसिद्ध भूशी डॅमनजीक सहलीसाठी गेलेले एक कुटुंबातील पाच व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेतील पाच जणांपैकी महिला आणि दोन मुलींचा मृतदेह बचाव पथकाला काल सापडला. तर आज सकाळी अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला.

पाण्याच्या प्रवाहात पाच मायलेकं एकमेकांना घट्ट बिलगले, एक लाट आली अन्... बघे नुसते पाहत होते, ते मात्र जीवानीशी गेले
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 11:48 AM

लोणावळ्याच्या प्रसिद्ध भूशी डॅमनजीक सहलीसाठी गेलेले एक कुटुंबातील पाच व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेतील पाच जणांपैकी महिला आणि दोन मुलींचा मृतदेह बचाव पथकाला काल सापडला. रात्री उशिरा शोध कार्यात अडथळे येत असल्याने शोध कार्य थांबवले होते. मात्र आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले असता अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेहही सापडला असून पाचव्या व्यक्तीसाठी शोधकार्य अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खाला पारावार उरला नाही. दरम्यान या धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

वाहून गेलं संपूर्ण कुटुंब

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून अनेक पर्यटक तेथे येत असतात. रविवारी अन्सारी कुटुंबही तेथे पर्यटनासाठी आले. सगळे जण पाण्याचा आनंद घेत होते. मात्र थोड्या वेळात त्यांच्या आनंदाला गालबोट लागले. बधब्यात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात दहाजण अडकले होते. त्या पैकी पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले तर पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यामध्ये अनेक लहान मुलांचा समावेश होता.

धक्कादायक व्हिडीओ समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले. त्यापैकी तिघांचे मृतदेह काल सापडले. साहिस्ता नियकत अन्सारी ( वय 36), अमिमा आदिल अन्सारी ( वय 13) आणि उमेश आदिल अन्सारी ( वय 8 ) या तिघांचे मृतदेह काल सापडले. तर आज सकाळी एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला. अद्याप एकाचा मृतदेह सापडलेला नाही.

धबधब्यातील एका खडकावर अडकलेलं कुटुंब मदतीसाठी याचना करत होतं, आरडाओरडा करत होतं, पण बघ्यांपैकी कोणीच पुढे आलं नाही. काही जण काठावर उभे राहून फक्त बघत होते, तर काही जण ही घटना मोबाईलमध्ये कैद करत होते. पण आपला जीव धोक्यात घालून कोणीही त्यांना वाचवण्यासाठी पाऊल पुढे टाकलं नाही.

एकीकडे पाण्याचा जोर वाढत असातना ते एकमेकांनी बिलगून, घट्ट मिठी मारून उभे होते. मात्र पाणी वाढू लागल्यावर अडकलेल्या त्या व्यक्तींना पाय रोवून उभं राहण कठीण झालं. आणि अचानक एका क्षणी जोरात लाट आल्याने त्यांचा पाय घसरला आणि वेगाने येणाऱ्या पाण्याच्या खळाळत्या प्रवाहात ते पडले आणि वाहून जाऊ लागले. त्यांच्यापैकी एका इसमाने त्यातील मुलांना उचलून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि पाण्याने त्यांना खाली खेचून नेले. हे विदार दृश्य पाहून तेथील अनेक लोक हळहळत होते, चुकचुकत होते. पण त्यांच्यापैकी कोणी जरा जरी पुढे आला असता, मदतीचा प्रयत्न केला असता तर आज ही वेळ आली नसती.

घरातलं लग्न झाल्यावर फिरायला आले आणि…

अन्सारी आणि खान कुटुंबियांकडे २७ जून रोजी लग्न होते. त्यानंतर दोन दिवसानंतर वलिमाचा (लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम) कार्यक्रम २९ तारखेला झाला. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी ३० तारखेला या कुटुंबियाने लोणावळ्यात जाण्याचा निर्णय घेतला. सकाळीच ते एका टेम्पो ट्रॅव्हलने निघाले. लोणावळ्यात १२ वाजता पोहचले. एकूण १७ जण लोणावळ्यात आले होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर दुपारी दोन वाजता भावाचा फोन आला. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याची मुलगी वाहून गेली. त्याच्या फोननंतर मी तातडीने निघालो आणि लोणावळ्यात आलो. असे पीडित कुटुंबियांच्या भावाने ‘टीव्ही ९ मराठी’ला सांगितले.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.