AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक परिमंडळात उद्या 69 हजार उमेदवार देणार आरोग्य विभागाची परीक्षा; मदतीसाठी हेल्प डेस्क सज्ज

नाशिक परिमंडळात उद्या होणारी सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा जवळपास 69 हजार उमेदवार देणार आहेत. या विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली आहे.

नाशिक परिमंडळात उद्या 69 हजार उमेदवार देणार आरोग्य विभागाची परीक्षा; मदतीसाठी हेल्प डेस्क सज्ज
प्रातिनिधिक फोटो.
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 5:57 PM

नाशिकः नाशिक परिमंडळात उद्या होणारी सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा जवळपास 69 हजार उमेदवार देणार आहेत. या विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

कोरोना १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवेतील गट-क व गड-ड सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली होती. त्यानुसार गट-क संवर्गाचे 2 हजार 739 व गट-ड संवर्गाचे 3 हजार 466 पदांची, असे एकूण 6 हजार 205 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार गट-क संवर्गाची लेखी परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी व गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा घेणाऱ्या न्यासा या कंपनीस सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र ईमेल, व्हॉट्स-अॅप मोबाईल वर पाठवून देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. कंपनीद्वारे केल्या जाणारी बैठक व्यवस्था, केंद्राचे आरक्षण, कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बैठक व्यवस्थेचे नियोजन, केंद्रामध्ये जॅमर बसविणे, प्रवेश पत्र निर्गमित करणे, प्रश्नपत्रिकांचे वाटप आदी न्यासा कंपनीमार्फत केले जात आहे.

142 परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था

सदरील भरती परीक्षा राज्यस्तरावरील 24 आणि मंडळ स्तरावरील 28 अशा एकूण 52 संवर्गासाठी घेण्यात येत आहे. राज्य स्तरावरील संवर्गाचे नेमणूक अधिकारी हे संबधित सहसंचालक असून मंडळ स्तरावरील पदांचे नेमणूक अधिकारी 8 उपसंचालक मंडळे आहेत. नाशिक परिमंडळात गट-क मधील 68 हजार 686 उमेदवार परीक्षा देणार असून तिन्ही जिल्हयातील एकूण 142 परीक्षा केंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा प्रथम सत्रात18 हजार 087, व्दितीय सत्रात 18 हजार 183 उमेदवार परीक्षा देणार आहेत. जळगाव जिल्ह्यात द्वितीय सत्रात 14 हजार 748 तर अहमदनगर जिल्ह्यात दितीय सत्रात 17 हजार 668 उमेदवार परीक्षा देणार आहेत.

नगरमध्ये प्रवेश पत्रे मिळाली

या आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये पुणे ब्युरो कार्यालयातील 1)केमीकल असिस्टंट 2) सांख्यिकी सहाय्यक 3) औषध निर्माण अधिकारी 4) कनिष्ठ लिपीक या 4 संवर्गाची परीक्षा अहमदनगर जिल्हयात होत असून त्या पदांचे पुणे ब्युरो कार्यालय हेच नियुक्ती कार्यालय आहे. त्यामुळे त्या पदांकरिता अर्ज केलेल्या राज्यभरातील उमेदवारांना अहमदनगर जिल्हयात प्रवेश पत्र मिळालेली आहेत.

अडचण आल्यास येथे साधा संपर्क

उपसंचालक,आरोग्य सेवा ,नाशिक मंडळ ,नाशिक या कार्यालयात मे, न्यासा कम्युनिकेशन या कंपनीने 2 प्रतिनिधी नेमून हेल्प डेस्क स्थापन केलेले असून अडमिड कार्ड व इतर शंकाचे निरसन करण्यासाठी उमेदवारांनी 95133 15535, 72920 13550, 95135 00203 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही डॉ. गांडाळ यांनी कळविले आहे. तसेच गट ड बाबतची परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 ला होणार आहे.

इतर बातम्याः

कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजारांचे अनुदान; नाशिकरांनी येथे साधावा संपर्क

कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजारांचे अनुदान; नाशिकरांनी येथे साधावा संपर्क

भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.