सर्व खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव, बेड तुटवड्यानंतर पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

सर्व खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव, बेड तुटवड्यानंतर पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय
पुण्यातील खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 7:17 PM

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. अशा स्थितीत पुण्यातील प्रमुख रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं एक मोठा निर्णय घेतलाय. खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. (80% beds in private hospitals in Pune will be reserved for corona patients)

“खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स कोविडसाठी राखीव ! कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी दवाखान्यातील ८० टक्के बेड्स कोविड उपचारासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. ३१ मार्चपासून हे बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध होतील”, असं ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केलंय.

पुण्यातील बेड्सची सध्यस्थिती काय?

पुण्यातील कोरोना स्थिती इतकी विदारक बनली असताना दुसरीकडे आरोग्य विभागासमोर बेड्सची समस्या निर्माण झाली आहे. पुणे शहरात साधारणपणे 5 हजार 8 बेड्स उपलब्ध आहेत. त्यातील सध्या केवळ 490 बेड शिल्लक आहेत. त्यात साध्या बेड्सची संख्या 243, ऑक्सिजन बेड 217, आयसीयू बेड 20 तर व्हेंटिलेटर बेड 10 आहेत. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार शहरात साधारण 2 हजार 682 बेड कमी पडत आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती –

पुणे शहरात रविवारी तब्बल 4 हजार 426 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात 2 हजार 107 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर पुण्यात गेल्या 24 तासांत 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 7 जण पुण्याबाहेरील होते. पुण्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार 123 आहे. त्यातील 645 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 25 लाख 9 हजार 112 वर जाऊन पोहोचली आहे. तर 22 लाख 770 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 16 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 219 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra lockdown update : राज्यात लॉकडाऊनची दाट शक्यता, सरकारकडून कोणती खबरदारी?

Maharashtra lockdown update : अखेर मुख्यमंत्र्यांचा आदेश, लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे निर्देश

80% beds in private hospitals in Pune will be reserved for corona patients

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.