AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Sahitya Sammelan : संमेलनासाठी उदगीर नगरी सज्ज, 2 दिवस आधीपासूनच कार्यक्रमांची रेलचेल

4 महिन्यापूर्वीच महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमावर्ती भागावर असलेल्या उदगीर शहरात 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार याची घोषणा झाली होती. लातूर जिल्ह्याच्या अनुशंगाने ही गर्वाची बाब असून तेव्हापासून संमेलनाच्या नियोजनाला सुरवात झाली होती. दरम्यानच्या काळात प्रशासकीय तसेच लोकप्रतिनीधींच्या बैठका पार पडल्या असून संमेलनाची रुपरेषा ठरविण्यात आली आहे. अखेर दोन दिवसावर हे संमेलन येऊन ठेपले असून उदगीर नगरी या इतिहासाची साक्षीदार होण्यास सज्ज झाली आहे.

Marathi Sahitya Sammelan : संमेलनासाठी उदगीर नगरी सज्ज, 2 दिवस आधीपासूनच कार्यक्रमांची रेलचेल
95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
| Updated on: Apr 20, 2022 | 11:59 AM
Share

लातूर : 4 महिन्यापूर्वीच महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमावर्ती भागावर असलेल्या  (Udgir) उदगीर शहरात 95 वे अखिल भारतीय (Marathi Sahitya Sammelan) मराठी साहित्य संमेलन होणार याची घोषणा झाली होती. (Latur District) लातूर जिल्ह्याच्या अनुशंगाने ही गर्वाची बाब असून तेव्हापासून संमेलनाच्या नियोजनाला सुरवात झाली होती. दरम्यानच्या काळात प्रशासकीय तसेच लोकप्रतिनीधींच्या बैठका पार पडल्या असून संमेलनाची रुपरेषा ठरविण्यात आली आहे. अखेर दोन दिवसावर हे संमेलन येऊन ठेपले असून उदगीर नगरी या इतिहासाची साक्षीदार होण्यास सज्ज झाली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये शहराचे रुपडे बदलले आहे तर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडणार आहे. संमेलनाला 22 एप्रिल रोजी सुरवात होणार असली तरी दोन दिवस अगोदरपासूनच विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.

संमेलनपूर्वीच कार्यक्रमाची मेजवाणी

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे 22 एप्रिलपासून अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरवात होणार आहे. त्यापूर्वी 20 एप्रिल रोजी सायंकाळी अजय-अतुल यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. येथील छत्रपती शाहू महाराज मुख्य सभामंडप येथे हा कार्यक्रम 7 ते 10:30 च्या दरम्यान पार पडणार आहे. तर संमेलनाच्या पूर्वसंध्येला भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपूरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, सिध्देश्वर झाडबुके यांचा ‘चला हवा येऊ द्या’ हा धमाल विनोदी कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे उदगीर नगरीला एक वेगळेच स्वरुप आले आहे.

स्वच्छता मोहिम वेगात

साहित्यिकांची सोय येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे नियोजन यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसह येथील लोकप्रतिनीधी तयारीला लागले आहेत. उदगीर शहरातील मुख्य रस्त्यांसह, संमेलन स्थळ परिसरात स्वच्छता मोहिम जोरदारपणे राबविण्यात येत आहे. जागोजागी स्वछता करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक-तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवरील ऐतिहासिक उदगीर शहरात भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने आयोजकांच्या वतीने जोरदार प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे.

“साहित्यिका आपल्या घरी अनोखा उपक्रम”

उदगीर शहरातील जवळपास 30 ते 35 महिलांनी आपल्याच घरी केलेली आहे. या संमेलनामध्ये पूर्ण हिंदुस्तान मधून लेखक, कवी, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यामध्येच महिला पण बाहेरगावाहून उदगीर शहरात येणार आहेत. व्यवस्थेच्या दृष्टीने उदगीर शहर हे मर्यादित असल्यामुळे महिलांसाठी संमेलनाच्या समितीला खास व्यवस्था करणे अवघड जात होते. त्यामधुनच साहित्यिका आपल्या घरी हा उपक्रम राबविण्याचे ठरवण्यात आले. उदगीर येथील डॉक्टर, प्राध्यापक, राजकीय, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांनी बाहेरून येणार्‍या महिला साहित्यिकासाठी आपल्या स्वतःच्या घरी राहण्याचीव्यवस्था करण्याचा संकल्प केला. लेखक, साहित्यिक, कवी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी उदगीर शहरासह, लातूर, नांदेड, देगलूर, कर्नाटक राज्यातील बिदर या ठिकाणी लॉज आरक्षित करण्यात आलेली आहेत.

पदाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी ठाण मांडून

या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांच्यासह अनेक जण उदगीर येथे ठाण मांडून आहेत. जवळपास 36 एकर परिसरात मंडप उभारण्यात आला आहे. त्यामध्ये विविध सभागृह आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुख्य मंडपात 5000 लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

ST employees: लाल परी मैदान खड़ी, नाशिक अन् जळगाव विभागात 70 टक्के संपकरी कर्मचारी रुजू, पण काम मिळेना

Video : नया दिन नया गाणा… रानू मंडलचं नवं बंगाली गाणं, नेटकरी म्हणतात, “खूप सुंदर दिसत आहेस”

ST employees: लाल परी मैदान खड़ी, नाशिक अन् जळगाव विभागात 70 टक्के संपकरी कर्मचारी रुजू, पण काम मिळेना

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.