Aurangabad News : औरंगाबादमधील जीवघेणे रस्ते! चिखलात बाईक अडकली; तासभर अथक परिश्रम करूनही बाईक निघाली नाही शेवटी बापाच्या हातावरच मुलाने सोडला जीव

कृष्णा परदेशी असे मृत मुलाचे नाव आहे. 8 वर्षीय कृष्णा गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे राहत होता. कृष्णाच्या पोटात दुखू लागल्याने त्याचे वडील बाबूलाल परदेशी त्याला दुचाकीवरून गंगापूर येथे घेऊन जात होते. मात्र, जाताना खराब रस्त्यावर चिखल असल्यामुळे दुचाकी त्यात फसली. तासभर अथक परिश्रम करून देखील मोटरसायकल चिखलातून काही केल्या निघत नव्हती. अखेर उपचाराअभावी दुर्दैवाने मुलाने त्यांच्या डोळ्यासमोर प्राण सोडले.

Aurangabad News : औरंगाबादमधील जीवघेणे रस्ते! चिखलात बाईक अडकली; तासभर अथक परिश्रम करूनही बाईक निघाली नाही शेवटी बापाच्या हातावरच मुलाने सोडला जीव
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 8:56 PM

औरंगाबाद : औरंगाबादचे(Aurangabad) संभाजीनगर असे नामकरण झाले असले तरी शहरवासियांच्या समस्या तशाच आहेत. येथील मुख्य समस्या आहे ती रस्त्यांची. औरंगाबादमधील रस्ते जीवघेणे बनले आहेत. खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे औरंगाबाद करांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात तर रस्त्यांची अवस्था अत्यंत भयानक आहे. चिखलात बाईक अडकल्याने(bike got stuck in the mud ) एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलाला दुचाकीवरुन रुग्णालयात नेत असताना बाईक चिखलात अडकली. सभर अथक परिश्रम करूनही बाईक निघाली नाही शेवटी बापाच्या हातावरच मुलाने जीव सोडला(child died ) . या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच प्रशासनाविरोधात तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. आजारी मुलाला दुचाकीवरून घेऊन जाताना दुचाकी चिखल्यात रुतल्याने चिमुकल्याने दुचाकीवरच प्राण सोडले.

बापाच्या डोळ्यासमोर मुलाने प्राण सोडले

कृष्णा परदेशी असे मृत मुलाचे नाव आहे. 8 वर्षीय कृष्णा गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे राहत होता. कृष्णाच्या पोटात दुखू लागल्याने त्याचे वडील बाबूलाल परदेशी त्याला दुचाकीवरून गंगापूर येथे घेऊन जात होते. मात्र, जाताना खराब रस्त्यावर चिखल असल्यामुळे दुचाकी त्यात फसली. तासभर अथक परिश्रम करून देखील मोटरसायकल चिखलातून काही केल्या निघत नव्हती. अखेर उपचाराअभावी दुर्दैवाने मुलाने त्यांच्या डोळ्यासमोर प्राण सोडले.

या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. ग्रामस्थांकडू यंत्रणा, राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. लोकशाहीतील लज्जास्पद घटना, राज्यकर्त्यांनो लाज वाटू द्या, स्वतःचे लेकरू जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्याचे दुःख काय असते अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून सोशल मीडियावर उमटत आहेत. नामांतरापेक्षा मुलभूत सेवा सुविधांकडे लक्ष दिले असते तर या निष्पाप बालकाचा बळी गेला नसता अशी संतापजनक प्रतिक्रिया देखील दिली जात आहे.

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

औरंगाबाद जिल्ह्यातील कसाबखेडा आणि माटेगाव या दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. माटेगाव आणि परिसरातून जवळपास 60 ते 70 विद्यार्थी कसाबखेडा या गावात शाळेत येतात, तर शेकडो शेतकऱ्यांना याच रस्त्यावरून वाहतूक करावी लागते मात्र हा पूल वाहून गेल्यामुळे हा रस्ता आता प्रवाश्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.