AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या कंपनीत पार पडलं चंद्रयान ३ च्या कोटिंगचं काम, सांगलीकरांची मान उंचावणारी घटना

या सुवर्णक्षणाचे अनेक भारतीयांना दूरचित्रवाणीवर प्रक्षेपणाचे दृष्य पाहिले. या यशस्वी कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक करण्यात आले.

या कंपनीत पार पडलं चंद्रयान ३ च्या कोटिंगचं काम, सांगलीकरांची मान उंचावणारी घटना
| Edited By: | Updated on: Jul 15, 2023 | 9:51 PM
Share

श्रीहरीकोटा : श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून शुक्रवारी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या दिशेनं यशस्वीपणे झेपावलं. विशेष म्हणजे ह्या GSLV MK III रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम सांगलीतील उद्योजक संदीप सोले यांच्या DAZZLE DYNACOATES PRIVATE LIMITED या फॅक्टरीत पार पडलं. ही बाब महाराष्ट्राची आणि सांगलीकराची मान उंचावणारी आहे. गेली तीस वर्षे केवळ संरक्षण आणि अंतराळ संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम या कंपनीमध्ये होत आहे. या जीएसएलव्ही यानाचा एक भाग सांगलीजवळील माधवनगरमध्ये असलेल्या डझल डायनाकोटस् या खासगी कारखान्यात तयार करण्यात आला आहे.

शुक्रवारी श्रीहरीकोटा येथील केंद्रामधून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रोच्या चंद्रायान-3 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या सुवर्णक्षणाचे अनेक भारतीयांना दूरचित्रवाणीवर प्रक्षेपणाचे दृष्य पाहिले. या यशस्वी कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक करण्यात आले.

दीड वर्षांपूर्वी तयार केला तो भाग

अंतराळ यानाला प्रक्षेपणानंतर जे इंधन आवश्यक आहे ते तयार करण्यात येणार्‍या भागाला संरक्षण आणि साठवण करणार्‍या उपकरणाची निर्मिती या कारखान्यात करण्यात आली. चंद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेला भाग सांगलीतील कारखान्यात दीड वर्षापूर्वी तयार करण्यात आला आहे.

उपकरणांची निर्मिती सुरू

सध्या गगन यानमध्ये वापरण्यात येणार्‍या उपकरणाची निर्मिती सुरू आहे. यापूर्वी पीएसएलव्ही अंतराळ यानासाठीही याच ठिकाणी हा सुटा भाग तयार करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगीकरणाच्या धोरणानुसार अंतराळ संशोधनामध्येही खासगीकरण सुरू आहे. यानुसार एका खासगी कंपनीसाठीही उपकरण तयार करण्यात आला आहे.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.