Cyclone Tej Mumbai | अरबी समुद्रातील ‘तेज’ चक्रीवादळ, मुंबईचा धोका टळला आता या दिशेला रवाना
अरबी समुद्रात मान्सूननंतरच्या पहिल्या चक्रीवादळासारखी परिस्थिती तयार होऊ लागली आहे. 'तेज' नावाच्या या चक्रीवादळाने अचानक दिशा बदलून आता ते उत्तर - पश्चिम दिशेला सरकले आहे. त्यामुळे मुंबई आणि गुजरातचा धोका टळला आहे.
मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : अरबी समुद्रात ( Arab Sea ) कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्याचे रुपांतर चक्रीवादळात होऊ शकते असे हवामान खात्याने म्हटले होते. या वादळाला ‘तेज’ असे ( Cyclone Tej ) नाव देण्यात आले आहे. हा कमी दाबाचा पट्टा सुरुवातीला जास्त शक्तीशाली झालेला नव्हता त्यामुळे त्याला चक्रीवादळाचा दर्जा द्यावा की नाही असा पेच तयार झाला होता. सुदैवाने या वादळाची दिशा आता बदलली आहे. हे वादळ आता मुंबई आणि गुजरातच्या किनाऱ्याने न जाता उत्तर -पश्चिम दिशेला ओमान किंवा येमेन देशाकडे सरकल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे मुंबई आणि गुजरातचा धोका टळला आहे.
अरबी समुद्रात मान्सूननंतरच्या पहिल्या चक्रीवादळासारखी परिस्थिती तयार होऊ लागली होती. कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे परंतू हवामान विभागाच्या तज्ज्ञ या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. हा लो प्रेशर एरिया काही दिवसात चक्रीवादळाच्या स्थितीत परावर्तित होऊ शकतो. हे चक्रीवादळ आता मुंबई आणि गुजरात किनारपट्टीला न धडकता उत्तर – पश्चिम दिशेला येमेन किंवा ओमान दिशेला गेले आहे. त्यामुळे मुंबई आणि गुजरातचा धोका आता टळला आहे. या चक्रीवादळाने आधी मुंबईत जरी वादळी पाऊस येण्याची शक्यता नसली तरी काही भागातील विशेषत: पुणे येथील तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने आधी व्यक्त केली होती. परंतू त्याची दिशा आता संपूर्णपणे बदलली असल्याने मुंबई तसेच गुजरातला काही धोका राहीला नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
येथे पाहा ट्वीट –
Depression over southwest Arabian Sea moved westwards and lay centered at 1130 hours IST of today, over the same region, about 900 km east-southeast of Socotra (Yemen), 1170 km southeast of Salalah Airport (Oman). Likely to intensify into a cyclonic storm during next 24 hours. pic.twitter.com/g5sx5KlURn
— India Meteorological Department (@Indiametdept) October 20, 2023
मान्सूननंतरचे पहिले चक्रीवादळ
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने या चक्रीवादळाचे नाव ‘तेज’ असे ठेवण्यात आले आहे. अरबी समुद्रातील कोकण किनारपट्टीने हे वादळ गुजरातच्या दिशेने वाटचाल करणार होते. परंतू आता ते येमेन किंवा ओमानच्या दिशेने सरकले आहे. हे मान्सूननंतरचे हे पहिलेच चक्रीवादळ म्हटले जात आहे.