चर्चा तर होणारच! करमळ्यात पहिल्यांदाच झाली भन्नाट स्पर्धा, ही स्पर्धा पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल…

वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेली ही स्पर्धा चर्चेचा विषय ठरत आहे. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तरुणाचा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला आहे.

चर्चा तर होणारच! करमळ्यात पहिल्यांदाच झाली भन्नाट स्पर्धा, ही स्पर्धा पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 2:10 PM

सोलापूर : काही स्पर्धा अशा असतात की त्याची चर्चा अनेकदा राज्यभर होत असते. त्यात विशेष बाब म्हणजे कुठेलही कारण नसतांना हौसेपोटी आयोजित केलेली चर्चा चर्चेचा विषय नक्कीच बनत असते. नुकतीच सोलापूरातील करमळ्यात ( Solapur Karmala ) एक स्पर्धा पार पडली आहे. करमाळा येथील कुर्डुवाडी रस्त्यावरील शुभम नगर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तब्बल 44 श्वानांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. त्याचं निमित्त होतं एका शुभम सोरटे या तरुणाचा वाढदिवस होता. श्वानांवर प्रेम करत असल्याने त्यांने ही स्पर्धा भरवली होती. नुकतीच ही स्पर्धा ( Competition ) पार पडली असून बक्षीस वितरणही करण्यात आले आहे.

आपला वाढदिवस खास व्हावा यासाठी अनेक जण शक्कल लढवत असतात. काहींना प्रसिद्धी मिळविण्यासाठी काहीतरी फंडे राबविण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र शुभम सोरटे याच्या वाढदिवसाला श्वान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

राज्यातील वेगवेगळया भागातून श्वान आणि त्यांचे मालक या स्पर्धेसाठी आलेले होते. करमाळा- कुर्डुवाडी रोडवरील शुभमनगर येथे ही स्पर्धा पार पडली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाला माजी आमदार पुत्र पै. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

त्यामध्ये गोल्डमॅन, लाडू रेशिंग क्लब पंढरपुर येथील श्वानाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तर सिंकदर काला, समाधान मदने पिंपळणेर यांना दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर यशवंती शुभम सोरटे पांडे श्वानाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेला जिल्ह्यातील 44 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे स्वरूप म्हणजे 22 राऊंड घेण्यात आले होते. त्यामध्ये धावण्याच्या स्पर्धा होत्या. ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

वाढदिवसाला श्वानाच्या धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्वानाला धावण्याचे कसब पाहून अनेकांनी टाळ्या वाजूवन प्रतिसाद दिला होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सोरटे यांच्या वाढदिवसाला श्वान प्रेमीची मोठी गर्दी झाली होती. याच दरम्यान सर्वांच्या उपस्थित काही मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे. मात्र, वाढदिवसाला श्वानांची शर्यत लावण्यात आली होती त्यामुळे अधिकच चर्चा होऊ लागली आहे.

करमळ्यात पार पडलेली ही स्पर्धा राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक श्वान प्रेमी या स्पर्धेबद्दल उलटसुलट चर्चा करत असून तरुणाचा वाढदिवसची यानिमित्ताने चर्चेचा विषय ठरत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.