Nagpur Murder : पत्नी नांदायला येत नाही म्हणून संतापलेल्या पतीने चाकून भोसकले, आरोपी अटक
मयत अंकिता भगत आणि सचिन भगत यांचा 8 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. या जोडप्याला दोन मुले आहेत. सचिनला दारुचे व्यसन होते. तो कुठलाही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. पतीकडून सतत होत असलेल्या छळाला कंटाळून काही महिन्यांपूर्वी अंकिता पतीचे घर सोडून माहेरी रहायला आली.
नागपूर : वेगळी राहत असलेली पत्नी सोबत राहायला येत नाही म्हणून पतीने तिची दोन लहान मुलांसमोरच हत्या (Murder) केल्याची घटना नागपूरच्या सोनेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी सोनेगाव पोलीस (Sonegaon Police) ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. अंकिता भगत असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर सचिन भगत असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पतीच्या छळाला कंटाळून पत्नी माहेरी राहात होती
मयत अंकिता भगत आणि सचिन भगत यांचा 8 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. या जोडप्याला दोन मुले आहेत. सचिनला दारुचे व्यसन होते. तो कुठलाही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. पतीकडून सतत होत असलेल्या छळाला कंटाळून काही महिन्यांपूर्वी अंकिता पतीचे घर सोडून माहेरी रहायला आली. त्यानंतर ती शिवणगाव फाट्यावर सुरक्षा रक्षकाची नोकरी करीत होती. ड्युटीवर असताना सचिन हा आपल्या मोठ्या मुलासोबत तेथे आला. यावेळी घरी परत येण्यासाठी सचिनने अंकिताकडे तगादा लावला. मात्र अंकिताने त्याला नकार दिल्याने संतापलेल्या सचिनने तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात अंकिता गंभीर जखमी झाली. यावेळी तेथे काम करणाऱ्या मजुरांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टारांन तिला मृत घोषित केले.
विशेष म्हणजे ही घटना घडत असताना त्यांची दोन्ही मुले समोर खेळत होती. चिमुकल्यांना काय झालं कळत नसल्याने त्यांनी रडायला सुरुवात केली. पोलिसांनी दोन्ही मुलांना बालसुधारगृहात पाठवलं असून बापाच्या रागाने दोन्ही मुलं आता आई वडिलांना पोरके झाले आहेत. पोलिसांनी वेळीच नाकाबंदी करून आरोपी पती सचिनला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सोनेगाव पोलीस करत आहे. (A husband killed his wife in a minor dispute in Nagpur)