Hingoli : देशात महामार्गाचं मोठं जाळं विणलं जातंय, हिंगोलीतच अरुंद रस्ते का? शेतकऱ्यांचा संताप

161 क्रमांकाचा महामार्ग हा वारंगा फाटा येथून बायपासने मार्गस्थ होणार होता. याकरिता प्रशासनाला तब्बल 300 कोटींचा खर्चही होता. त्यामुळे हा अधिकाऱ्यांचा घाट मोडीत काढून गावकऱ्यांनी गावातूनच रस्ता मार्गस्थ करावा असा आग्रह केला होता. त्यानुसार वारंगा फाटा येथूनच हा महामार्ग मार्गस्थ झाला आहे. पण येथील वारंगा टी पॉंईंटपर्यंत नागपूर,हिंगोलीकडे जाणारी मोठी वाहतूक असते.

Hingoli : देशात महामार्गाचं मोठं जाळं विणलं जातंय, हिंगोलीतच अरुंद रस्ते का? शेतकऱ्यांचा संताप
मंजुरीनुसार महामार्गाचे काम 60 मीटर रुंद असेच व्हावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याना घेराव घातला होता.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 6:42 PM

हिंगोली : देशात (Network of highways) महामार्गाचे जाळे विणलं जात असल्याने दळणवळण वाढले आहे. परिणामी विकासाचा आलेख चढता ठेवण्यासाठी या रस्त्यांची कायम महत्वाची भूमिका राहिलेली आहे. (Hingoli District) हिंगोली जिल्ह्यातूनही महामार्ग क्रमांक 161 हा मार्गस्थ होत आहे. 60 मीटर रुंद याप्रमाणे हा रस्ता करणे बंधनकारक आहे. पण कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा टीपॉईंट ते दांडेगाव रोड असा 800 मीटरचा रस्ता मात्र केवळ 30 मीटर अरुंद केला जात आहे. हा दुजाभाव का असा सवाल येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अचानक (Width of the road) रस्त्याची रुंदी कमी केल्याने अपघाताचा धोका तर आहेच पण रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी या महामार्गाचे काम बंद पाडत अधिकाऱ्यांना घेराव घातला होता.

अधिकाऱ्यांच्या दुजाभाव कशामुळे?

161 क्रमांकाचा महामार्ग हा वारंगा फाटा येथून बायपासने मार्गस्थ होणार होता. याकरिता प्रशासनाला तब्बल 300 कोटींचा खर्चही होता. त्यामुळे हा अधिकाऱ्यांचा घाट मोडीत काढून गावकऱ्यांनी गावातूनच रस्ता मार्गस्थ करावा असा आग्रह केला होता. त्यानुसार वारंगा फाटा येथूनच हा महामार्ग मार्गस्थ झाला आहे. पण येथील वारंगा टी पॉंईंटपर्यंत नागपूर,हिंगोलीकडे जाणारी मोठी वाहतूक असते. असे असतानाही केवळ 30 मीटरचा रस्ता बनवला जात आहे. त्यामुळे सुविधांपेक्षा अडचणी अधिक अशीच स्थिती होणार आहे. नियमाप्रमाणे 60 मीटर रस्ता करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महामार्गाचे काम बंद

161 क्रमांकाचा महामार्ग हा हिंगोलीकडून नागपूरकडे मार्गस्थ होतो. मात्र, ऐन गावाच्या परिसरातच हा महामार्ग अरुंद करण्यात आला आहे. 60 मीटर एवढा रुंद रस्ता होणे अपेक्षित असताना केवळ 30 मीटर रुंदीचा बनवला जात आहे. त्यामुळे संतप्त वारंगा गावकऱ्यांनी या महामार्गाचे काम बंद करुन नियमाप्रमाणे रस्ता उभारला जावा अशी मागणी केली आहे. केवळ घाटामधूनचा बायपास न झाल्याने अधिकारी असा दुजाभाव करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या समस्येवर कसा तोडगा काढला जाणार हे पहावे लागणार आहे.

अन्यथा वाहतूकही बंद..

नियमाप्रमाणे 60 मीटर रुंद असाच महामार्ग होणे गरजेचे आहे. वारंगा फाटा येथेच रस्त्याची रुंदी ही 30 मीटर एवढी करण्यात आली आहे. त्यामुळे वारंगा गावकऱ्यांसह येथील परिसरातील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. आता महामार्गाचे काम बंद केले आहे. त्वरीत मागणीनुसार रस्ता उभारला गेला नाहीतर मग या महामार्गावरील वाहतूकही बंद केली जाणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...