ठाकरे गटाच्या आमदारांना पोलीस अधिकाऱ्याचे आव्हान, या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

गेल्यावेळचे हे राजकारण पहाता आगामी विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघावर भाजप आणि शिंदे गट यापैकी कोण निवडणूक लढविणार हे अद्याप निश्चित नाही. मात्र, शिंदे गटाकडे ही जागा गेल्यास येथून प्रदीप शर्मा हे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.

ठाकरे गटाच्या आमदारांना पोलीस अधिकाऱ्याचे आव्हान, या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
PRADIP SHARMA Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 5:03 PM

मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : एके काळी शिवसेना पक्षातून निवडणूक लढविणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आता ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केलीय. पोलीस दलात प्रदीप शर्मा यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी विशेष ओळख आहे. प्रदीप शर्मा यांच्या नावावर 100 हून अधिक चकमकींचा विक्रम आहे. 1983 मध्ये ते पोलीस सेवेत रुजू झाले होते. 2019 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रदीप शर्मा यांनी शिवसेना पक्षाकडून 2019 मध्ये नालासोपारा विधानसभा लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

25 फेब्रुवारी 2021 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्फोटक सामग्री सापडली होती. या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. तसेच, व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही त्यांचा हात असल्याचा संशय त्यांच्यावर होता. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 23 ऑगस्ट रोजी त्यांना जामीन मंजूर केला.

प्रदीप शर्मा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ मरोशी रोड परिसरात कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्राच्या ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांच्याविरोधात शर्मा निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अंधेरी पूर्व मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना पक्षाने संधी दिली. तर, भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांनी ऋतुजा लटके यांच्याविरोधात निवडणुकीसाठी दंड थोपटले होते. मात्र, ऐनवेळी पक्षाने त्यांची उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके निवडून आल्या. तर, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ऋतुजा लटके यांनी ठाकरे गटाची साथ दिली.

कार्यालयाचे उद्घाटनवेळी प्रदीप शर्मा यांनी मी मागील आठ वर्षापासून समाजकारणात आहे. अंधेरीकरांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. नागरिकांनी त्या समस्या लेखी स्वरूपात या कार्यालयात द्याव्यात. अंधेरी पूर्वेकडील प्रत्येक वार्डात कार्यालय उभारणार आहे. प्रत्येक वार्डातील कार्यालयात आठवड्यातून एकदा भेट देणार आहे. सध्या मी कोणत्याही पक्षात नाही. पण, जनतेची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवू शकतो असे महत्वाचे विधान केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.