हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्याची कामे वेगाने करा, अजितदादांचे अधिकाऱ्यांना आदेश

अजित पवार म्हणाले, औद्योगिक वसाहत परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूस आणि वाकड रस्त्यांचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे. म्हाळुंगे मार्गे हिंजवडी रस्त्याच्या कामाचेही नियोजन करावे. एमआयडीसीने कचरा प्रकल्पासाठी त्वरित कार्यवाही करावी.

हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्याची कामे वेगाने करा, अजितदादांचे अधिकाऱ्यांना आदेश
लोकांचे लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न पहा
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 3:22 PM

पुणे : मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील सुविधांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

सूस आणि वाकड रस्त्यांचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करा

अजित पवार म्हणाले, औद्योगिक वसाहत परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूस आणि वाकड रस्त्यांचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे. म्हाळुंगे मार्गे हिंजवडी रस्त्याच्या कामाचेही नियोजन करावे. एमआयडीसीने कचरा प्रकल्पासाठी त्वरित कार्यवाही करावी. माण, मारुंजी येथे पोलीस चौकीस मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

औद्योगिक परिसरातील समस्या त्वरित सोडवा

बैठकीत निवासी परिसर रस्त्यावरील सीसीटीव्ही, उद्यान, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, एसटीपी प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, खेळाचे मैदान, अग्निशमन केंद्र आदींबाबत चर्चा करण्यात आली. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी औद्योगिक परिसरातील समस्या त्वरित सोडवाव्यात. नागरिकांना नव्या सुविधांमुळे दीर्घकालीन लाभ होईल, असेही अजित पवार म्हणाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण साहित्य आणि पुस्तिका तयार

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आदी विभागाचे प्रमुख अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. आर्थिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत बचत गटातील महिला, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना संबंधित विविध यंत्रणांच्या समन्वयाने प्रशिक्षण द्यावे , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. प्रशिक्षण साहित्यात सोप्या भाषेत सर्वसमावेशक माहितीचा समावेश करावा असेही पवार म्हणाले. प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण साहित्य आणि पुस्तिका तयार करण्यात येणार असून महिला, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना मंडळ निहाय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

संबंधित बातम्या

VIDEO : मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात कार्यक्रम, राज्यपाल भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले, तुळजाभवानी माता की जय!

VIDEO | रस्त्यावर दोन-चार नोटा फेकल्या, बाईकस्वार आमिषाला भुलताच त्याचे सव्वादोन लाख उडवले

Accelerate road works in Hinjewadi, Maan and Marunji areas, orders of Ajit Pawar to the authorities

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.