Accident | काळ आला होता, दुचाकीवरुन चाललेल्या एकाच कुटुंबातील तिघा भावांच्या आयुष्याचा दुर्देवी शेवट

Accident | बुलढाण्यातील भीषण अपघाताने अख्ख गाव हळहळलं. या अपघातात दोन सख्खे भाऊ, तर तिसऱ्या चुलत भावाचा मृत्यू झाला. दुसरा अपघात सातारा खटावमधील धोडेंवाडी येथे घडला.

Accident | काळ आला होता, दुचाकीवरुन चाललेल्या एकाच कुटुंबातील तिघा भावांच्या आयुष्याचा दुर्देवी शेवट
Accident
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 9:44 AM

सातारा : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा-मोताळा रस्त्यावर भीषण अपघात झाला. रस्ता क्रॉस करताना ट्रिपल सीटवर असलेल्या दुचाकी ट्रकला धडकली. दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री 9.30 च्या दरम्यान नांदुरा येथ घडला. अपघात इतका भीषण होता की, अपघातात दुचाकीवरील तिघे भाऊ जागीच ठार झाले. यात दोन सख्खे भाऊ, तर तिसरा चुलत भाऊ आहे.

उमेश कांडारकर, प्रशांत कांडारकर आणि नितीन कांडारकर अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहे. तिघेही मृत मलकापूर तालुक्यातील झोडगा गावचे रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केलाय. या दुर्देवी घटनेने झोडगा गावावर शोककळा पसरली आहे.

साताऱ्यात ओमनी कार झा़डावर आदळली

सातारा खटावमधील धोडेंवाडी येथे भीषण अपघात घडलाय. एक ओमनी कार झाडावर आदळली. या दुर्देवी घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. बनपुरी सिद्धेश्वर कुरोली येथील हे रहिवासी असल्याची माहिती आहे.

गतिरोधकामुळे युवकाचा मृत्यू

लातूर-औसा रस्त्यावर गतिरोधकावर भरधाव वेगात मोटारसायकल आपटल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे. बुधोडा गावाजवळ कन्स्ट्रक्शन कंपनीने गतिरोधक उभारले आहेत. या गतिरोधकावर रात्री हा अपघात घडला आहे. अभिषेक गायकवाड असं मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. वन विभागाची परीक्षा देऊन परतताना अपघात, एकाचा मृत्यू

वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते मंगरुळपिर महामार्गावर रात्री 11 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झालाय. रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक लागून एक युवक ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. शुभम डाखोरे आणि मनोज बुरकडे अशी त्यांची नावं असून ते वन विभागाची परीक्षा देऊन गावी परतत होते. शेलूवाडा गावाजवळ हा अपघात झाला असून ‘सास’ कंट्रोलरूमच्या स्वयंसेवकांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविण्यात आलेय मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.