AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुक्रवारची सकाळ, चार ठिकाणी मोठे अपघात!

विरार, चांदवड, औरंगाबाद आणि नाशकात आज भीषण अपघात झाले. या वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारची सकाळ, चार ठिकाणी मोठे अपघात!
| Updated on: Dec 18, 2020 | 9:48 AM
Share

मुंबई : विरार, चांदवड, औरंगाबाद आणि नाशकात आज भीषण अपघात झाले (Accident On Friday Morning). या वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल 23 जण जंभीर जखमी झाले आहेत (Accident On Friday Morning).

पहिला अपघात : मुंबई-आग्रा महामार्गावर तीन गाड्यांचा भीषण अपघात

चांदवडला मुंबई-आग्रा महामार्गावर मजूर घेऊन जाणारी खाजगी बस, गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक आणि टॅक्सी यांचा विचित्र भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस महामार्गाच्या कडेला एका टॅक्सी आणि 2 टपऱ्यांवर पलटी होवून पडली. या अपघातात मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील सुमारे 75 मजूर सुदैवाने बचावले आहेत.

यापैकी काही मजुरांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात 2 टपऱ्या आणि टॅक्सीचा चक्काचूर झाला आहे.

दुसरा अपघात : भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरची टेम्पो आणि रिक्षाला जोरदार धडक

मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीतही भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने उभ्या टेम्पो आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. विरार हद्दीतील सकवार परिसरात मुंबई लेनवर पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत चालकासह चार जण जखमी झाले आहेत.

तर, कंटेनर, टेम्पो आणि रिक्षा रस्त्यावर पलटी झाले असून, टेम्पोतील बिसलरीच्या पाण्याच्या बॉटल रस्त्यावर पडल्या. टायर फुटल्याने बिसलरी भरुन असणारा टेम्पो मुंबई लेनवर उभा होता. पाठीमागून आलेल्या कंटेनरने भरधाव वेगात येऊन, टेम्पो आणि समोरील रिक्षाला उडविले. याबाबत विरार पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे (Accident On Friday Morning).

तिसरा अपघात : औरंगाबादेत पिकअप व्हॅन नदीच्या पुलावरुन खाली कोसळली

औरंगाबाद जिल्ह्यातील ईसारवाडी फाट्यावरही भीषण अपघात झाला आहे. येथे एक पिकअप व्हॅन नदीच्या पुलावरुन खाली कोसळून हा अपघात झाला. या अपघातात 9 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 9 महिलांना घेऊन पिकअप व्हॅन औरंगाबादकडे निघाली होती. वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप थेट पुलाखाली कोसळली. जखमी महिलांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चौथा अपघात : मुंबई-नाशिक महामार्गावर 3 गाड्यांचा भीषण अपघात, 10 जण जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर जवळ एटी महामंडळची बस, इनोव्हा आणि कंटेनर या 3 गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. अपघातात बसमधील चालक-वाहकसह 10 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 प्रवाशी आहेत. जखमींवर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून चार प्रवाशांना उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. तर 2 प्रवाशांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

इनोव्हा गाडीमध्ये मुंबई कोर्ट येथील नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.

Accident On Friday Morning

संबंधित बातम्या :

पुण्यात नवले ब्रिज परिसरात भीषण अपघात

आजीबाईच्या अंगावरुन ट्रक गेला… पुढे काय झालं?, पाहा थक्क करणारा व्हिडीओ

ताडोबा फिरायला निघालेल्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

किड्यांचा मारा चुकवताना विचित्र अपघात, सांगलीतील आयर्विन पुलावर किड्यांचा भडिमार

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.