AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्याचा नादच खुळा, ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा रोड शो

मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावांमधील पॅनल आणि मंडळं नवनवीन शक्कल लढवत असल्याचं दिसून येतंय. साताऱ्यात देखील असंच एक उदाहरण पाहायला मिळालं.

साताऱ्याचा नादच खुळा, ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा रोड शो
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 8:22 PM
Share

सातारा : सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा ज्वर चढलाय. लोकसभा निवडणुकीतील वातावरण सामान्य वाटावं इतकं निवडणूक असलेल्या गावातील प्रचाराचं वातावरण तापलंय. त्यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावांमधील पॅनल आणि मंडळं नवनवीन शक्कल लढवत असल्याचं दिसून येतंय. साताऱ्यात देखील असंच एक उदाहरण पाहायला मिळालं (Actress Priya Berde campaign for Grampanchayat Election in Vade Satara).

सातारा शहरालगत असणाऱ्या वाढे गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पॅनेल वेगवेगळी शक्कल लढवताना दिसला. वाढे गावातील वाढेश्वर अजिंक्य पॅनेलने तर यावेळी निवडणूक प्रचारासाठी थेट अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनाच आवताण दिलं. प्रिया बेर्डे यांचा जिप्सी गाडीतून गावात रोड शो घेऊन प्रचाराची सांगता केली. यावेळी प्रिया बेर्डे यांना पाहण्यासाठी वाढे गावासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. यामुळे गावात होणाऱ्या दुरंगी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेय.

वाढे गावात ग्रामपंचायत निवडणुकीत वाढेश्वर अजिंक्य पॅनेल आणि अजिंक्य पॅनेल वाढे अशी दुरंगी लढत पहायला मिळत आहे. गावात 11 सदस्य संख्येची ग्रामपंचायत आहे. सध्या अनुसुचित जमातींची व्यक्ती गावात नसल्यामुळे 10 जागांवर ही निवडणूक लढवली जात आहे. दोन्ही पॅनेलकडून समोरासमोर एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत. या गावात पाणी योजना, गावातील बंदिस्त गटारे, गावची विकासाची प्रलंबित कामे अशा मुद्द्यांवर ही निवडणूक होतेय. दोन्ही पॅनेल ताकदीने निवडणूक लढत आहेत. यामुळे गावात होणाऱ्या या दुरंगी लढतीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

नक्षलवाद्यांकडून ग्रामपंचायत निवडणूक उधळण्याचा डाव उघड, गोंदियात पुरुन ठेवलेली स्फोटकं जप्त

वयाच्या 73 व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात, सलग 10 वी पंचवार्षिक, एकदाही पराभूत नाही, हरिव्दार यांची गोष्ट

आईला चिन्हं आलं ऑटो, पठ्ठ्यानं ऑटोच घरावर ठेवला !

Actress Priya Berde campaign for Grampanchayat Election in Vade Satara

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.