AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde | परळी धनंजय मुंडे यांना सोडल्यास पंकजा मुंडे यांच्यासाठी दुसरा सुरक्षित मतदारसंघ कुठला?

Pankaja Munde | पंकजा मुंडे भाजपाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यासाठी दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरु आहे. पंकजा यांच्यासाठी एका मतदारसंघाची चर्चा आहे.

Pankaja Munde | परळी धनंजय मुंडे यांना सोडल्यास पंकजा मुंडे यांच्यासाठी दुसरा सुरक्षित मतदारसंघ कुठला?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 9:20 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. त्यांनी शरद पवार यांना राजकीय धक्का देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे राज्याच्या राजकारणातील बरीच समीकरण बदलणार आहेत. अजित पवार यांनी उचललेल्या या राजकीय पावलामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याच भाजपाचा उद्देश आहे.

त्यासाठी अजित पवार यांची साथ भाजपासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पण त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत काय होणार? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

समीकरणं कशी बदलणार?

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघांनी मिळून विधानसभा निवडणूक एकत्र लढवल्यास जागा वाटप कस होणार? हा मुख्य मुद्दा आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्यावेळी जिल्हा, पातळीवर अनेक समीकरण बदलली जाणार आहेत. आतापर्यंत परस्परांच्या विरोधात लढत असलेल्या पक्षातील नेत्यांना एकत्र येऊन लढाव लागणार आहे. हे सर्व जुळवून आणणं इतकं सोपं नसेल.

राष्ट्रवादीला किती जागा मिळतील?

लोकसभा आणि विधानसभेसाठी जागा वाटपचा जो फॉर्म्युला आहे, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या 13 आणि विधानसभेच्या 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपाच्या काही प्रस्थापित नेत्यांना फटका बसू शकतो. यात पंकजा मुंडे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.

परळीची जागा कोणाला जाणार?

पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. अजित पवार यांच्यासोबत त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक एकत्रित लढवल्यास कदाचित पंकजा मुंडे यांची परळीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पंकजा मुंडे यांच्यासाठी दुसरा सुरक्षित मतदारसंघ कुठला?

अशा परिस्थितीत आता पंकजा मुंडे यांच्यासाठी नव्या विधानसभा मतदारसंघाचा शोध सुरु झाला आहे. पंकजा मुंडे भाजपाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरु आहे. पंकजा मुंडे यांना नगर जिल्ह्यातील पाथर्डीतून निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे. पाथर्डी विधानसभा मतदारसंघ हाच पंकजा यांच्यासमोर पर्याय आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.