हिवाळी अधिवेशनाआधी विधिमंडळाचं मुंबईत विशेष अधिवेशन होणार, नेमकं काय घडणार?

राज्याचे नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ येत्या 5 डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन मुंबईत होणार असल्याची माहिती आहे. या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनानंतर याच आठवड्यात नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे.

हिवाळी अधिवेशनाआधी विधिमंडळाचं मुंबईत विशेष अधिवेशन होणार, नेमकं काय घडणार?
विधानभवनImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 5:34 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळे आता महायुतीचं सरकार बनणार आहे. पण महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेचा पेच लवकर सुटला नाही. महायुतीत गृहखात्यावरुन पेच निर्माण झालेला बघायला मिळाला. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. पण त्यांचा गृहखात्यावर दावा होता. त्यामुळे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा इतक्या दिवसांपर्यंत रखडला. या दरम्यान एकनाथ शिंदे हे देखील आजारपणातून गेले. यामुळे गोष्टी हव्या तशा पुढे सरकल्या नाहीत. या दरम्यान तीन दिवसांपूर्वी भाजप नेत्यांकडून 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल, अशी माहिती ट्विटद्वारे देण्यात आली. यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जावून तब्येतीची विचारपूस केली. यानंतर एकनाथ शिंदे हे आज मुंबईत वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.

या सर्व घडामोडी सुरु असताना आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ येत्या 5 डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानंतर राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी येत्या 7 आणि 9 डिसेंबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन मुंबई होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे दरवर्षी नागपुरात होते. त्यामुळे नियमानुसार नव्या सरकारचं हिवाळी अधिवेशनदेखील नागपुरातच होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 16 ते 23 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार आहे.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे मोठे निर्णय घेणार?

दरम्यान, एकनाथ शिंदे यांची आज प्रकृती बरी आहे. त्यामुळे ते आज आपल्या आमदारांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे येत्या 5 डिसेंबरला शिवसेनेच्या कोणत्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घ्यावी, कोणत्या नेत्याला कोणतं खातं द्यावं? याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी उद्यापर्यंतचाच वेळ आहे. त्यामुळे या दोन दिवसांत एकनाथ शिंदे मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाच्या आशेत आहेत. त्यामुळे गेल्या सरकारमध्ये रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार या सरकारमध्ये होईल आणि आशावादी आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.