AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhaji Raje : ‘अमित शाह रायगडला येणार, म्हणून मी…’ वाघ्या कुत्र्याबाबत संभाजीराजे काय म्हणाले?

"आज चंद्रशेखर बावनकुळेंसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. आम्हाला महसूल विभागाकडून 30 एकर जमीन मिळणार आहे, त्यासाठी ही भेट घेतली" असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

Sambhaji Raje : 'अमित शाह रायगडला येणार, म्हणून मी...' वाघ्या कुत्र्याबाबत संभाजीराजे काय म्हणाले?
Sambhaji Raje Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 17, 2025 | 12:06 PM
Share

“वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलं आहे. कुठलाही इतिहास नसताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे. पहिल्यादिवसापासून माझी भूमिका आहे, ते कुत्र हटवलं पाहिजे. तुकोजीराव होळकर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली. कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही. तुकोजी महाराजांच नाव सोनेरी अक्षरात लिहिलं पाहिजे, रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारी घेतली आहे” असं संभाजी महाराज म्हणाले. आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर ते मीडियाशी बोलत होते.

“माझी मुख्यमंत्री महोदयांसोबत या संदर्भात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री महोदयानी मला सांगितलय, मी लवकरच समिती स्थापन करणार आहे. आज मी मुंबईत आलोय, वाघ्या कुत्रा हटवण्यासंदर्भात आज किंवा उद्या वेळ देणारं, सविस्तरपणे चर्चा होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडला येणार, म्हणून मी विषय थांबवलेला. डेडलाईन कुठलीही नाही. दंतकथेतून तयार झालेलं वाघ्या कुत्रं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं चुकीच आहे. म्हणून सरकार माझ्या मागणीची दखल घेईल अशी अपेक्षा आहे” असं संभाजीराजे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच मुंबईत स्मारक हवं

“छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत स्मारक व्हावे. अरबी समुद्रात स्मारक करू म्हणतात. कुठंही करा, उदयनराजे किंवा उद्धव ठाकरे म्हणतात तसं राजभवनात करा. गडकोट किल्ल्यांचे संवर्धन व्हावे. रायगडाप्रमाणे इतर किल्ल्यांचे जतन व्हावे. आम्ही फोर्ट फेडरेशन काढतोय, 25 किल्ले आम्ही संवर्धित करणार आहोत. महाराजांच्या जिवंत स्मारकाचे अर्थात किल्ल्यांचे जतन संवर्धन आवश्यक आहे” असं संभाजीराजे म्हणाले.

‘आज कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही’

“आज चंद्रशेखर बावनकुळेंसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. आम्हाला महसूल विभागाकडून 30 एकर जमीन मिळणार आहे, त्यासाठी ही भेट घेतली” असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. “बावनकुळे यांचे आभार. असोसिएशनची फाईल मंजूर करावी असं त्यांना म्हटलं. त्यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम होण्यासाठी मदत होणार आहे” असं संभाजी राजे म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.