Pahalgam Terror Attack : धक्कादायक, नालासोपाऱ्यात पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन
Pahalgam Terror Attack : पोलिसांनी सांगितलं की, पाकिस्तानी झेंडा जाळल्यानंतर वाकोल्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली. सध्या शांतता आहे. तपास सुरु आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनं सुरु आहेत.

पाकिस्तानी झेंड्याचे समर्थन करणाऱ्या तीन तरुणांना नालासोपाऱ्यात अटक करण्यात आली आहे. उस्मान गणी, तौशिद आझाद शेख आणि अदनान अफसर शेख अशी अटक करण्यात आलेल्या मुस्लिम तरुणांची नाव आहेत. त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलीस कास्टडी मिळाली आहे. 26 एप्रिल रोजी नालासोपारा येथे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त सुरु होता. त्यावेळी या निषेध आंदोलनात वापरलेल्या पाकिस्तानी झेंड्यावरून हा आमच्या धर्माचा झेंडा आहे, तुम्ही वापरू शकत नाहीत, म्हणत वाद घातला होता.
याचे पडसाद म्हणून हिंदू-मुस्लिम दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी महेंद्रकुमार माली यांच्या तक्रारीवरून तीन तरुणांविरोधात गुन्हा दाखल झाला. पाकिस्तानी झेंडा आणि दहशतवादी कृत्याचे समर्थन करून, भारताची सार्वभौमत्ता, एकात्मता आणि अखंडता, धोक्यात आणण्याची कृती केली म्हणून तीन मुस्लिम तरुणावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक केली आहे. भाजप युवा मोर्चा सचिव अशोक शेळकेंनी केली होती तक्रार. महेंद्र कुमार मालींच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल.
वाकोल्यात दोन गट भिडले
बजरंग दलाने शनिवारी मुंबईच्या वाकोला भागात मंदिरात आरती केली. त्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी आणि पॅलेस्टाइनचा झेंडा जाळला. त्यावर अल्पसंख्याक समुदायाच्या काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर दोन्ही गटात झडप झाली. त्यामुळे इथे तणाव निर्माण झाला होता. वाकोल पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 189(2) आणि 190 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
परभणी रस्त्यावर पाकिस्तानी झेंडे
परभणी शहरातील वसमत येथे अज्ञाताने रस्त्यावर पाकिस्तानी झेंड्याचे पेंटिंग करुन पाकिस्तान विरोधात रोष व्यक्त केला. दरम्यान महानगरपालिकेकडून झेंडे काढण्यात आले आहेत. काही काळासाठी रस्त्यावरील पाकिस्तानची झेंडे चर्चेचा विषय बनले होते.
पुण्यात पाकिस्तानी झेंड पायदळी तुडवले
पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावर पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर रस्त्यावर चिकटवले. रस्त्यावर पायदळी झेंडे चिटकवत पाकिस्तानचा निषेध केला. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौकात रस्त्यावर पायदळी पाकिस्तानचे झेंडे. पाकिस्तानचे झेंडे रस्त्यावर चिटकवून पायदळी तुडवले जात आहेत.