नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिवसैनिकांचा जल्लोष, पुन्हा फटाके फोडले

दुपारी जिल्हा बँकेचे मतदान संपल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडल्याचे आपण सर्वांनी पाहिले, त्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेला हायव्होल्टेज ड्रामाही आपण पाहिला, यामुळे बराच काळ कणकवलीत तणाव होता, पोलिसांच्या फौजफाट्याने छावणीचे स्वरूप आले होते ते कसेबसे शात झाले, तोच शिवसैनीकांनी नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर पुन्हा फटाके फोडले आहेत.

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिवसैनिकांचा जल्लोष, पुन्हा फटाके फोडले
नितेश राणे, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 6:37 PM

गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू होती, मात्र आज तिसऱ्या दिवशी नितेश राणे यांना न्यायलायाने मोठा झटका दिला आहे. नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. दुपारी जिल्हा बँकेचे मतदान संपल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडल्याचे आपण सर्वांनी पाहिले, त्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेला हायव्होल्टेज ड्रामाही आपण पाहिला, यामुळे बराच काळ कणकवलीत तणाव होता, पोलिसांच्या फौजफाट्याने छावणीचे स्वरूप आले होते ते कसेबसे शात झाले, तोच शिवसैनीकांनी नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर पुन्हा फटाके फोडले आहेत.

जामीन फेटाळल्यानंतर शिवसैनिकांचा पुन्हा जल्लोष

नितेश राणे यांचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर कणकवलीत पुन्हा शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला आहे. शिवसैनिकांनी पुन्हा फटाके फोडण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पुन्हा भाजप आणि शिवसैनिक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कोकणात शिवसैनिक विरुद्ध राणे संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे.

नितेश राणे हायकोर्टात जाणार

जिल्हा सत्र न्यायलयाने जामीन नाकरल्यानंतर आता नितेश राणे हायकोर्टात धाव घेणार आहेत, हायकोर्टात आम्हाला जरूर न्याय मिळेल अशा प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहेत. जामीन नाकरल्यामुळे नितेश राणेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोर्टाने नितेश राणे यांचा मोबाइल जप्त करून कस्टडी मागितली आहे. मात्र, आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. तिथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार आहोत. तिथे सुनावणी होईपर्यंत आम्हाला बाजूला राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नितेश राणे काही शरण वगैरे येणार नाहीत. मात्र, पोलिसांना तपासात आजपर्यंत सहकार्य केले आहे आणि मदत मागितली तरी ती करू, असे ते म्हणाले. अशी माहिती राणेंच्या वकिलांनी दिली आहे.

Nitesh Rane | नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात जाणार; वकिलांची माहिती

Yamaha Aerox 155 ते TVS Jupiter 125, 2021 मध्ये लॉन्च झाल्या शानदार स्कूटर्स, पाहा टॉप 5 गाड्या

Sushmita Senनं सांगितलं रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपचं कारण; म्हणाली, अशा गोष्टींचा विचार करायला लागले तर…

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.