Monsoon : दिलासादायक..! महाराष्ट्रात वेगाने सक्रीय होतोय मान्सून, आजची स्थिती काय ?
मान्सून पावसावरच खरीप हंगाम अवलंबून आहे. मान्सूनच्या हजेरीनंतरच खरीप हंगामातील पेरण्या होणार असून आता पाऊस राज्यात सक्रीय झाला तर पेरणीचे मुहूर्त साधले जाणार आहे. यातच हवामान विभागाकडून दिलासादायक वृत्त असून शुक्रवारी कोकणात दाखल झालेला मान्सून शनिवारी मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आगेकूच करीत आहे.
मुंबई : राज्यात उशीरा आगमन झालेला (Monsoon) मान्सून आता अधिक वेगाने (Maharashtra) राज्यात सक्रीय होत आहे. पोषक वातावरणामुळे हे शक्य होत असून शुक्रवारी (Kokan) कोकणात दाखल झालेला मान्सून आता कोकणासह मुंबईत आगेकूच करीत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मान्सूनला घेऊन जे चिंतेचे ढग होते ते आता कुठे तरी दूर होत असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून हा सबंध राज्यात सक्रीय होणार आहे. शनिवारी मुंबईसह उपनगरात मान्सूनने आगेकूच केल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.
मार्ग सुखकर शेतकऱ्यांना दिलासा
मान्सून पावसावरच खरीप हंगाम अवलंबून आहे. मान्सूनच्या हजेरीनंतरच खरीप हंगामातील पेरण्या होणार असून आता पाऊस राज्यात सक्रीय झाला तर पेरणीचे मुहूर्त साधले जाणार आहे. यातच हवामान विभागाकडून दिलासादायक वृत्त असून शुक्रवारी कोकणात दाखल झालेला मान्सून शनिवारी मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आगेकूच करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत मान्सूनच्या आगमनाबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता उशीरा का होईना पण अधिक गतीने तो सक्रीय होत असल्याने समाधान आहे.
South West Monsoon has advanced today, the 11th June 2022, over most parts of Konkan including Mumbai and some parts of Madhya Maharashtra. pic.twitter.com/N1moXsVbcO
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 11, 2022
असा सक्रीय होणार मान्सून
गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनच्या आगमनानंतर चित्र बदलले असून कोकणातून हा मान्सून मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील काही भागात सक्रीय झाला आहे. मान्सूनसाठी पोषक वातावऱण असल्याने आता दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक आणि संपूर्ण तामिळनाडूत मान्सून दाखल होणार आहे. पण कोकणातून दाखल झालेला मान्सून अवघ्या दोन दिवसांमध्ये राज्या व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पूर्व मान्सूनची हजेरी
राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह परिसरात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावलेली आहे. एकंदरीत मान्सून आगमानाची प्रतीक्षा संपली असून आता अपेक्षित पाऊस झाला की बळीराजा चाढ्यावर मूठ ठेवण्यास मोकळा हे निश्चित.