Maharashtra : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनंतर महाराष्ट्र अलर्ट मोडवर, मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनंतर राज्य सरकारने तातडीने काही नियमबदल करत निर्बंध लावले होते. हे निर्बंध या बैैठकीनंतर आणखी कडक होणाार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
1 डिसेंबरपासन राज्यातील शाळा सुरू होणार आहेत, मात्र कोरोनाचा नवा व्हेरिएंट आल्यानं सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील शाळांबाबत काय निर्णय घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत कोणते निर्णय घेतले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यातली नियमावली आणखी कडक होणार?
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनंतर राज्य सरकारने तातडीने काही नियमबदल करत निर्बंध लावले होते. हे निर्बंध या बैैठकीनंतर आणखी कडक होणाार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार नाही, मात्र केंद्रशी बोलून काही निर्बंध लावाले लागतील असं सूचक विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत राज्यातील अधिकारी, टास्क फोर्सचे अध्यक्ष हेही उपस्थित राहणार आहेत, मुख्यमंत्री परिस्थितीचा आढावा घेऊन काही निर्णय घेऊ शकतात.
मुख्यमंत्री शाळांबाबत काय निर्णय घेणार?
राज्यात 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार आहेत. तसा प्रस्ताव शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी ठेवला, त्यानंतर त्याला आरोग्य विभागाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर या निर्णयात काही बदल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नियमांचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाई
संभाव्य धोका ओळखून राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमांचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्याात आले आहेत. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास तुम्हाला 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.