गौतमी पाटीलला तोडीसतोड जवाब, भर कार्यक्रमात गडी भिडला; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल..
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा नुकताच एक कार्यक्रम नगर जिल्ह्यात पार पडला आहे. हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत असून एका तरुणाचा आणि गौतमीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अहमदनगर : सोशल मीडियावर असणाऱ्यांना गौतमी पाटील हे नाव माहिती नाही असा व्यक्ति शोधून सापडणार नाही. प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून गौतमी पाटील हिने अक्षरशः महाराष्ट्रातील तरुणाईला भुरळ घातली आहे. सबसे कातील असं म्हंटलं तर अनेकांच्या तोंडातून आपसूकच गौतमी पाटील असे शब्द बाहेर पडतात. त्यामुळे गौतमी पाटील आणि तिचे डान्स गेल्या काही महिन्यांपासून सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. असे असतांना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना मोठी मागणी आहे. महिनाभर प्रतिक्षा करावी लागते तेव्हा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची तारीख मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात झालेला एक कार्यक्रम चर्चेचा विषय ठरत आहे.
एका पठ्ठ्याने मंचासमोरच गौतमी पाटीलला टक्कर दिली आहे. गौतमी सारखा हुबेहूब डान्स या तरुणाने केल्याचं समोर आले. याच दरम्यान मोठा राडा झाला होता. गौतमीच्या कार्यक्रमात गर्दी आणि राडा हे समीकरण झाल्याचे पुन्हा एकदा पहीला मिळालं आहे.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि राडा जणू हे समिकरणच बनलं आहे. कोपरगावच्या कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने गौतमीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. तरुणाईची मोठी या कार्यक्रमात पाहायला मिळाली होती.
याच कार्यक्रमात मंचासमोर एका तरुणाने गौतमी सारखा डान्स करण्याचा प्रयत्न करुन गौतमीला टक्कर दिली. तर अनेक तरुण सेल्फीसाठी स्टेज जवळ जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय.
ठिकठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी आणि राड्याचा अनुभव पाहता सुरुवातीला गौतमी येण्याचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती.
मात्र तरीही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गर्दी आणि गोंधळ झालाच. पोलिस आणि आयोजकांची गर्दी नियंत्रणात ठेवताना मोठी दमछाक झाली होती. काही वेळ पोलीसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला.
मात्र याच काळात तरुणाने गौतमी पाटीलच्या समोर केलेल्या डान्स शिट्या आणि टाळ्याचा आवाज पाहायला मिळाला. गौतमी पाटील हिनेही तरुणाला जवाब देत डान्स केल्यानं मंचासमोरचा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
गौतमी पाटील हिची सध्या सोशल मिडियावर मोठी क्रेझ आहे. जिथं गौतमी पाटील हिचा कार्यक्रम असतो तिथे तरुण पोहचत असतात. त्यात काही जण गौतमीच्या समोर डान्स करतात त्यामुळे ठिकठिकाणी राडा झाल्याचे पाहायला मिळाले असून नगरमध्ये देखील तोच अनुभव पोलिसांना आला आहे.