“या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले”; उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा गवगवा केला…

केंद्राचे 6 आणि राज्याचे 6 असे एकूण 12 हजाराचे अनुदान राज्याला देण्यात येणार असल्याचे अश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले; उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा गवगवा केला...
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 4:01 PM

अहमदनगर : सर्वांची इच्छा होती या योजनेला मंजूर मिळवी साखळाली योजनेमुळेच 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सांगितले. या योजनेमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जमिनी सिंचनाखाली येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता आता साखळाई योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील 35 गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती आहेय, हा संपूर्ण परिसर पूर्ण कोरडवाहू आहेय. जर या गावात पाणी आलेय तर हा भाग बागायती होईल.

गेल्या 25 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. दरवर्षी कोकण किनारपट्टीच पाणी पश्चिमेला पावणे दोन टीएमसी पाणी वाहून जाते तर पाणी कुकडीत प्रकल्पात वळवून पाण्याची क्षमता वाढवावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होते आहे.

तर त्या योजनेला राज्य सरकारने 15 दिवसांपूर्वी मान्यता दिली आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कुकडी प्रकल्पाततून विसापूर तलावात पाणी आणले जाणार आहे. आणि विसापूर गावातून चिखली घाटा पर्यंत हे पाणी आणले जाणार असून उपसा सिंचनाद्वारे पाणी 4 ठिकाणी वळविण्यात येणार आहे. त्यातून तब्बल 35 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचा शब्दही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्याच हिताचे अनेक निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत.

तर केंद्राचे 6 आणि राज्याचे 6 असे एकूण 12 हजाराचे अनुदान राज्याला देण्यात येणार असल्याचे अश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विम्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया विमा भरावा लागणार असल्याचे अश्वानही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, उत्पादन खर्च कमी करायचे असेल तर नसर्गिक शेती केली पाहिजे. त्यासाठी शासनाकडूनही वेगवेगळ्या प्रकारची मदत केली जाणार आहे.शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास साधण्यासाठीच शेत, रस्ते मोकळे करण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्त्यांची माहिती सांगताना सांगितले की, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते आता सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात आले आहेत.

तर महिलांना एसटी बस प्रवासात 50 टक्के सवलत दिली असल्यामुळेच त्याचा परिणाम असा झाला की एसटी भरुन महिला प्रवास करत आहेत. तसेच मुलगी जन्माला आली की 5 हजार रुपये दिले जाणार असून समाज्याच्या सर्वच क्षेत्रात आपण काम करत असल्याचे अश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.