जुळ्या बाळांना जन्म देऊन सुखरुप ठेवलं, कोरोनाग्रस्त माऊलीने 24 तासात डोळे मिटले!

मूळ मुंबईतील चेंबूरची असलेली महिला अहमदनगरमधील निंबळकला आली होती. (Ahmednagar Corona Positive Lady dies soon after giving birth to twins)

जुळ्या बाळांना जन्म देऊन सुखरुप ठेवलं, कोरोनाग्रस्त माऊलीने 24 तासात डोळे मिटले!
Follow us
| Updated on: May 29, 2020 | 12:24 PM

अहमदनगर : कोरोनाबाधित महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिल्याची बातमी येऊन 24 तासही उलटले नसताना काळजाला घरं पाडणारी दु:खद वार्ता आली आहे. जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या अहमदनगरमधील ओल्या बाळंतीणीने जगाचा निरोप घेतला. माऊलीने प्राण सोडण्यापूर्वी बाळांना जन्म देऊन सुखरुप ठेवल्याचं ऐकून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. (Ahmednagar Corona Positive Lady dies soon after giving birth to twins)

मूळ मुंबईतील चेंबूरची असलेली महिला अहमदनगरमधील निंबळकला आली होती. त्रास होऊ लागल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ती ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

महिलेचे गुरुवारी (28 मे) सिझेरियन करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमरास तिने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिला. दोन्ही बाळांचे वजन 2 किलो इतके भरले. त्यामुळे कुटुंबासह आरोग्य यंत्रणेत आनंदाची लकेर उमटली. मात्र शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता तिची प्राणज्योत मालवल्याची चटका लावणारी बातमी आली आणि सर्वच हळहळले. जिल्हा आरोग्य यंत्रणेने या वृत्ताला दुजोरा दिला.

हेही वाचा : नगरमध्ये कोरोनाबाधित गर्भवती महिलेचं सिझेरियन, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जुळ्यांना जीवनदान

अहमदनगर जिल्ह्यात आज नवीन 9 रुग्ण सापडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर पोहोचली आहे. घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेला एक,  ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला एक, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला एक, संगमनेरमध्ये दोन, तर निमगावमध्ये (राहाता) चार रुग्ण सापडले. बाधित रुग्णामध्ये 4 पुरुष, 4 महिला आणि 4 वर्षीय लहान मुलगी यांचा समावेश आहे.

(Ahmednagar Corona Positive Lady dies soon after giving birth to twins)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.