अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू! फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप, काय कारवाई होणार?

रुग्णालयातील अतिदक्षता विभागालाच ही आग लागली. शॉटसर्किमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने नगरकडे रवाना झाले.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू! फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप, काय कारवाई होणार?
नगरच्या सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग कशामुळे?
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 2:50 PM

अहमदनगर : ऐन दिवाळीत संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. नगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागालाच ही आग लागली. शॉटसर्किमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने नगरकडे रवाना झाले. (Ahmednagar hospital fire kills 10 corona patients, MLA Sangram Jagtap alleges error in fire audit)

अहमदनगर जिल्हा रुग्णालयालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत 10 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर एक रुग्ण गंभीर जखमी झाला आहे. अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. या घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. दरम्यान रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी केलाटय. तर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवलर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जगताप यांनी केलीय.

जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार- मुश्रीफ

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने कोल्हापूरवरुन नगरकडे रवाना झाले आहेत. शॉटसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळावर जाऊन पाहणी करणार. तसंच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिलीय. तसंच आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचंही मुश्रीफ यांनी सांगितलं.

गृहमंत्र्यांकडून श्रद्धांजली अर्पण

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ट्वीट करुन आगीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केलीय. ‘नगर सिव्हिल हॉस्पिटल आयसीयूमध्ये आगीच्या दुर्घटनेत 10 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर जखमींवरील उपचारांसाठी तातडीने योग्य ती मदत करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. मृतांच्या आप्तपरिवाराच्या दुःखात आम्ही सहसंवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो!’, असं ट्वीट वळसे पाटलांनी केलंय.

दुर्घटनेची सखोल चौकशी करा, फडणवीसांची मागणी

अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

इतर बातम्या : 

आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असणारे सुनील पाटील कोण?; वाचा सविस्तर

दाऊदच्या साथीदारासोबत अनिल देशमुख ‘सह्याद्री’त काय करत होते?; मोहित कंबोज यांचा सवाल

Ahmednagar hospital fire kills 10 corona patients, MLA Sangram Jagtap alleges error in fire audit

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.