रोहित पवार अजून लहान, त्यांच्याविषयी…; जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर

NCP Leader Jitendra Awhad on Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्या जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे. तसंच महंत सुधीरदास यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. आव्हाड नेमकं काय म्हणालेत? त्या विधानाबाबत आव्हाडांचं स्पष्टीकरण काय? वाचा सविस्तर...

रोहित पवार अजून लहान, त्यांच्याविषयी...; जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 1:56 PM

शिर्डी, अहमदनगर | 04 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल केलेल्या वक्तव्यमुळे वाद निर्माण झाला. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली. शिवाय त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांच्या ट्विटबाबत आव्हाडांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. रोहित पवार काय बोलतात त्याला मी फार महत्व देत नाही. ते अजून लहान आहेत. त्यांची ही पहिलीच टर्म आहे. मला त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

रोहित पवार यांचं ट्विट जसंच्या तसं?

आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे.

देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!

महंत सुधीरदास यांच्याबाबत आव्हाड काय म्हणाले?

नाशिकचे ते संत कोण? सुधीरदास हेच ना? त्यांनीच वेदोक्त-पुरानोक्त वाद निर्माण केला. त्यांच्या खूप कहाण्या आहेत. त्यांच्या डोक्यात आजही वर्णव्यवस्था बसलेली आहे. त्याबाबत मी काय बोलावं?, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

प्रभूरामाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं. त्यानंतर मोठा वाद झाला. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. मी पुराव्यांच्या आधारे बोलतो. मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो, असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.