साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा; भाजपचे माजी खासदार सुजय विखेंची मागणी

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, यामुळे शिर्डीत भिकारींची संख्या वाढली आहे. हा निधी मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. साई संस्थानकडे मोठा निधी असल्याचे सांगितले जात असतानाच, विखे पाटील यांच्या मागणीला काहीजण पाठिंबा देत असून काहींनी विरोधही केला आहे.

साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा; भाजपचे माजी खासदार सुजय विखेंची मागणी
साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा; भाजपचे माजी खासदार सुजय विखेंची मागणी
Follow us
| Updated on: Jan 05, 2025 | 5:44 PM

शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले आहेत. हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलीय. प्रसंगी यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशाराही सुजय विखे यांनी दिलाय. सुजय यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देत आहे. मात्र यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोफत जेवण बंद करावं आणि मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा, अशी अपेक्षा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलीय.

सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्यावरून मोठी खळबळ उडाली आहे. देणगीदार साई भक्तांनी 365 दिवस अन्नदानासाठी बुकिंग करून ठेवलं असून याचा आर्थिक बोजा साईबाबा संस्थानवर पडत नाही. साई संस्थानकडे साडेचारशे कोटीहून अधिक निधी अन्नदानासाठी पडून आहे. तो निधी साई संस्थांनला अन्य कुठेही वापरता येत नाही. अनावश्यक लोकांनी येथे येऊन जेवण करणे आणि गुन्हेगारी वाढणे या दृष्टीने बघू नये. महाप्रसाद म्हणून भाविक साई प्रसादालयात भोजन करत असतात, असं साई संस्थानचे माजी विश्वस्त आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकनाथ गोंदकर यांनी म्हटलं आहे.

‘हे सगळं करण्याची आवश्यकता नाही’, युवक काँग्रेसची प्रतिक्रिया

सुजय विखे पाटील कुठल्या संदर्भाने बोलले हे आम्हाला माहीत नाही. मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी देशभरातील देणगीदार साईभक्त साई संस्थानला देतात. त्यातून अन्नदान होत असतं, याच्या माध्यमातून देशभरातील भाविक अन्नप्रसादाचा लाभ घेतात. ज्या साई भक्तांना ऐच्छिक रक्कम द्यायची ते देऊ शकतात. विकास कामांसाठी साईबाबा संस्थानकडे करोडो रुपयांचा निधी आहे ते त्यातून विकास करू शकतात. त्यामुळे हे सगळं करण्याची आवश्यकता नसल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी संग्राम कोते यांनी म्हणटलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाची भूमिका काय?

“सुजय विखे पाटलांनी जी भूमिका भाषणातून व्यक्त केली. त्या भूमिकेला आमचं समर्थन असून पूर्वीपासून आम्ही ही मागणी करत होतो की, साई भक्तांनी दिलेल्या दानाचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने साई संस्थानने करावा. साई संस्थान प्रसादालयात मोफत प्रसादामुळे काही लोक ते जेवण म्हणून घेतात आणि त्याचा दुरुपयोग देखील होतो आहे. शिर्डीत गुन्हेगारी आणि भिक्षेकरुनची संख्या वाढत आहे. कोणतीही गोष्ट मोफत असू नये. साई संस्थांनच्या प्रसादालयातील भोजनाला मोल असावं”, असं शिंदे गटाचे पदाधिकारी कमलाकर कोते यांनी म्हटलं.

साईभक्तांचं म्हणणं काय?

सुजय विखे यांच्या वक्तव्यानंतर साई प्रसादालयात जेवणासाठी आलेल्या देशभरातील साईभक्तांनी नाराजी व्यक्त केलीय. साईबाबांनी आपल्या हयातीत आरोग्य सेवा आणि भुकेलेल्यांना मोफत जेवन दिले. गरज असेल अशा ठिकाणी शुल्क आकारणे ठीक आहे. पण सर्वसामान्यांना जर मोफत जेवण मिळतंय त्यात आक्षेप घेण्याच कारण काय? असा सवाल साईभक्तांनी उपस्थित केलाय. तर काही साई भक्तांनी सुजय विखे यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देत जो साईभक्त देश-विदेशातून साईबाबांच्या दर्शनाला येतो तो साईभक्त दहा ते पंधरा रुपयांचं शुल्क जेवणासाठी देऊ शकतो, असं काही साईभक्त म्हणत आहेत.

भाविकांकडून अन्नदान फंडात आत्तापर्यत 450 कोटी रक्कम

सामान्य‌ दिवशी साई प्रसादालयात दिवसभरात 50 ते 60 हजार भक्त मोफत भोजनाचा लाभ घेतात. शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी 70 ते 80 हजार भक्त जेवतात. उत्सव काळात ही संख्या 1 लाखांहून अधिक असते. एका दिवसाच्या अन्नदानासाठी पाच लाख रुपये, सुट्टीच्या दिवशी 10 लाख तर उत्सव काळात 15 लाख देणगी आकारली जाते. काही भाविक अन्नदानासाठी इच्छेनुसारही देणगी देवू शकतात. माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी सांगितल्याप्रमाणे अन्नदान फंडात आत्तापर्यत 450 कोटी रक्कम भाविकांकडून जमा. 2023 – 2024 या वर्षात 46 कोटी 24 लाख भाविकांनी दिले आहेत. 2023 – 2024 या वर्षात भाविकांनी साईचरणी 451 कोटींचे दान केले तर संस्थानचे एकुण उत्पन्न 819 कोटी 57 लाख झाले आहे ( ठेवींवरील व्याज धरून ). संस्थानकडे आज मितीला तीन हजार कोटींची रक्कम जमा आहे जी विविध राष्ट्रीयकृत बँकेत ठेव म्हणून ठेवण्यात आली आहे. संस्थानकडे 450 किलो सोने, साडे सहा हजार किलो चांदी तर 9 कोटींचे हिरे आणि मौल्यवान खडे आहेत.

मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.