Ram Mandir | महाराष्ट्रातील ‘या’ सरपंचाला राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण

अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभारलं गेलं आहे. या मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण महाराष्ट्रातील एका खेडेगावच्या सरपंचालादेखील मिळालं आहे. विशेष म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाखो भाविकांची इच्छा आहे. केवळ मोजक्याच जणांना या दिवशी प्रत्यक्ष रामलल्लांचं दर्शन घेता येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या या सरपंचाचादेखील समावेश असणार आहे.

Ram Mandir | महाराष्ट्रातील 'या' सरपंचाला राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 8:10 PM

कुणाल जायकर, Tv9 मराठी, अहमदनगर | 12 जानेवारी 2024 : अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभारलं गेलं आहे. या मंदिराचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही. पण मंदिर बांधकामाचं काम जवळपास पूर्ण झालंय. तसेच येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. तब्बल 400 ते 500 वर्षांच्या मागणीनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर उभारण्यात आलंय. या मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रमदेखील तितकाच भव्यदिव्य आणि मोठा असणार आहे. या कार्यक्रमाचं जगभरातील अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. जगभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातीलही अनेक दिग्गजांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एका गावाच्या सरपंचाला या भव्य कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनादेखील या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं नाही, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा दर्शनाला जाणार नाहीत, तर ते नाशिकला काळाराम मंदिरात जावून श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. तिथेच ते त्यादिवशी संध्याकाळी गोदातीरी महाआरती देखील करणार आहे. उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मिळालं नाही का? असा प्रश्नही विचारण्यात आला. पण त्यांनी त्यावर थेट उत्तर देणं टाळलं आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मिळालं की नाही, याबाबत साशंकता असताना राज्यातील एका खेडेगावच्या सरपंचांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आल्याने अनेकांकडून या सरपंचांचं कौतुक केलं जात आहे.

महाराष्ट्राच्या ‘या’ सरपंचाला मिळालं राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण

विशेष म्हणजे हे सरपंच साधेसुधे सरपंच नाहीत तर नावाजलेले सरपंच आहेत. त्यांनी गावात केलेल्या क्रांतीमुळे त्यांचं जगभरात नाव पोहोचलं आहे. आम्ही आदर्श हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांच्याबद्दल बोलतोय. पोपटराव पवार यांच्याविषयी सर्वांना माहिती आहे. त्यांच्या हिरवे बाजार गावाला किती संकटांना सामोरं जावं लागलं, दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या, पाण्याची भीषण टंचाई सोसावी लागली हे शब्दांत सांगता येणार नाही. पण पोपटराव पवार 1989 साली गावचे सरपंच बनले. त्यांनी लोकोपयोगी कामे केली. गावात पाण्याची योजना राबवली. संपूर्ण गावाच्या सहकार्याने विविध योजना राबवल्या आणि गावाचा कायापालट केला. त्यामुळे पोपटराव पवार यांच्या कामाची ख्याती जगभरात पसरली. याच पोपटराव पवार यांना राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह आदर्श हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपनेचे निमंत्रण आलं आहे. नाशिक विभागातून सामाजिक कामे करणाऱ्या 10 नामवंतांना या सोहळ्याचे निमंत्रण आलं आहे. दरम्यान, अहमदनगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक रवींद्र साताळकर आणि नाशिक विभागाचे संपर्कप्रमुख घनश्याम दोडिया यांनी अण्णा हजारेंना आज निमंत्रण पत्रिका दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.