Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर; अधिकाऱ्यांसोबत प्रदीर्घ बैठक, नेमकं काय ठरलं?

मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी आज मंत्रालयात अतिशय महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी करचोरी, करगळती रोखून कर्तव्यात हयगय न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर; अधिकाऱ्यांसोबत प्रदीर्घ बैठक, नेमकं काय ठरलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 6:17 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वित्त व नियोजन’सह ‘राज्य उत्पादन शुल्क’ मंत्रीपदांची सुत्रे हाती घेताच आज मंगळवारी मंत्रालयात दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त, नियोजन आणि उत्पादनशुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर आले असून करसंकलन आणि महसुलवाढीच्या प्रक्रियेत सुसुत्रता, सुधारणा आणत ‘रिझल्ट ओरियंटेड’ काम करण्याचे निर्देश त्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार करावा. करचोरी, करगळती रोखण्याच्या कर्तव्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात ‘वित्त व नियोजन’ विभागासह ‘राज्य उत्पादन शुल्क’ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री अशिष जयस्वाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्य आयुक्त आशीष शर्मा, वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा) सचिव शैलजा ए., लेखा व कोषागारे विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपसचिव रविंद्र औटे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इंदिसे, सहआयुक्त सुनिल चव्हाण, अपर आयुक्त यतीन सावंत, उपायुक्त सुभाष बोडखे, उपायुक्त शंकर जगताप आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी प्रलंबित योजना, आवश्यक निधी, तसेच राज्याच्या उत्पन्नाचा आढावा घेतला. या बैठकीत राज्यातील महसुली सुधारणा, शेती विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी वित्तीय योजना आणण्यावर भर देण्याच्या सूचना देत राज्याच्या महसूल वाढीसाठी करचोरी, करगळतीसह गैरकारभार रोखण्याच्या सूचना दिल्या. करसंकलनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येतील. पण कामात परिस्थितीत हयगय चालणार नसल्याचे सांगत रिझल्ट ओरियंटेड काम करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सविस्तर आढावा घेतला. राज्यातील बेकायदा दारूविक्रीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले.

धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.