निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना 3 महिन्यांचं आगाऊ अनुदान, अजित पवारांच्या निर्देशानंतर 1 हजार 273 कोटी वितरीत

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्यायविभागासाठी तब्बल 1273 कोटी 25 लाख रुपयांचा आगाऊ (ॲडव्हान्स) निधी आज तातडीने वितरित करण्यात आला (Ajit Pawar on fund for social justice department).

निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना 3 महिन्यांचं आगाऊ अनुदान, अजित पवारांच्या निर्देशानंतर 1 हजार 273 कोटी वितरीत
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 8:53 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्यायविभागासाठी तब्बल 1273 कोटी 25 लाख रुपयांचा आगाऊ (ॲडव्हान्स) निधी आज तातडीने वितरित करण्यात आला (Ajit Pawar on fund for social justice department). कोरोनामुळे उत्पन्नात घट असतानाही समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय प्राधान्याने घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय विभागातर्फे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यामुळे लाखो नागरिकांना मदत होते. या योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना, केंद्रपुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा समावेश आहे.

या योजनांसाठी अर्थसंकल्पात 2723 कोटी 49 लाखांची तरतूद केली होती. मात्र, कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. कोरोनामुळे राज्याचे उत्पन्न ठप्प झाले असतानाही वंचित घटकांना फटका बसू नये, त्यांना आधार मिळावा यासाठी एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांच्या अनुदानाची तब्बल 1273 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम सामाजिक न्याय विभागाला आज आगावू देण्यात आली. येत्या काही दिवसात ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. समाजातील गरीब, वंचित, निराधार, विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्याचा शासनाचा हा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाकडून अवघे 130 कोटी प्राप्त झाले असताना राज्य शासनाने स्वत:च्या तिजोरीतून ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार योजनेतून राज्यात, 11 लाख 15 हजार लाभार्थींना प्रतिमहिना 1 हजार रुपये दिले जातात. श्रावणबाळ सेवा योजनेतून 11 लाख 72 हजार लाभार्थींना प्रतिमहिना 1 हजार रुपये मानधन दिले जाते. केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत 65 ते 79 वयोगटातील 10 लाख 73 हजार लाभार्थींना प्रतिमहिना 1 हजार रुपये मानधन देण्यात येते. यामध्ये 80 टक्के म्हणजेच प्रतिव्यक्ती 800 रुपये हिस्सा राज्य शासनाचा असतो. वय 80 वर्षे आणि त्यावरील वयोगटाच्या 68 हजार 300 लाभार्थींना प्रतिमहिना 1 हजार रुपये देण्यात येतात. त्यापैकी, 50 टक्के म्हणजे 500 रुपये राज्य शासन देते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे 70 हजार 500 लाभार्थीं आहेत. त्यांना प्रतिमहिना 1 हजार रुपये दिले जातात. त्यातील 70 टक्के म्हणजे प्रति लाभार्थी 700 रुपये राज्य सरकार देते. इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचे राज्यात 10 हजार 300 लाभार्थीं असून त्यांच्या प्रतिमहिना 1 हजार रुपये मानधनांपैकी 70 टक्के रक्कम राज्य सरकार देते. कोरोनामुळे सुरु संचारबंदीच्या काळात नागरिकांना बाहेर पडावं लागू नये यासाठी एप्रिल, मे व जून या 3 महिन्यांचे मानधन एकत्रित देण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम सामाजिक न्याय विभागातर्फे लवकरच जमा होईल, असेही  उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

Jalgaon corona update : जळगावात कोरोनाचा पाचवा बळी, जिल्ह्यात आतापर्यंत 18 कोरोनाबाधित

Yavatmal Corona Update : काल 27, आज 19, यवतमाळमध्ये तीन दिवसात 55 रुग्ण, बाधितांची संख्या 79 वर

पुणे विभागातील 230 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 1457 वर : विभागीय आयुक्त

मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू, 3 दिवसात 3 पोलिसांच्या मृत्यूने खळबळ

Ajit Pawar on fund for social justice department

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.