कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला नातेवाईकांकडून ‘जादू की झप्पी’, उत्साहाच्या भरात नियमांचे तीन तेरा
अकोल्यात कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्ण घरी पोहोचल्यानंतर गृहप्रवेशावेळी सर्वांनी त्याला कडकडून मिठी (Relatives Hug Corona free Patient after discharge at Akola) मारली.
अकोला : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे (Relatives Hug Corona free Patient after discharge at Akola) कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. अकोल्यात कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला काल (28 एप्रिल) डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत त्याचा उत्साह वाढवला. मात्र तो घरी पोहोचल्यानंतर त्याच्या गृहप्रवेशावेळी सर्वांनी त्याला कडकडून मिठी मारली. यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आली.
अकोला शहरातील अकोटफैल परिसरात राहणार एक व्यक्ती 4 एप्रिलला कोरोना संशंयित म्हणून (Relatives Hug Corona free Patient after discharge at Akola) रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान 13 एप्रिल, 19 एप्रिल, 20 एप्रिल, 23 आणि 24 एप्रिल या सर्व दिवशी त्याची फेरतपासणी करण्यात आली.
या चाचण्यांचा अहवाल समाधानकारक असल्याने सोमवारी त्याला कोरोनामुक्त घोषित करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती होते. या सर्वांनी त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर टाळ्या वाजवून उत्साह वाढवला.
त्यानंतर हा रुग्ण घरी पोहोचल्यानंतर सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम अक्षरश: पायदळी तुडवण्यात आले. हा रुग्ण रूग्णालयातून घरी आलेल्यानंतर अनेक उपस्थितांनी त्या रूग्णासोबत हस्तांदोलन केलं. त्याची गळाभेट घेतली. कोरोना रुग्ण बरा होऊन आल्यानंतर गळाभेट टाळण्याचं सांगितलं आहे. मात्र तरीही या रुग्णाच्या स्वागताला नातेवाईकांची गर्दी होती. या रुग्णाला पुढचे 14 दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे.
अकोल्यातील कोरोना रुग्णांची सध्याची स्थिती :
- एकूण रुग्ण : 17
- कोरोनामुक्त डिस्चार्ज : 08
- मृत्यू : 01
- आत्महत्या : 01
- सध्या उपचार सुरु असलेले : 07
अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे. त्यातील आठ जणांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तर यातील एकाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे आता केवळ 7 रुग्ण कोरोना अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु (Relatives Hug Corona free Patient after discharge at Akola) आहेत.
संबंधित बातम्या :
औरंगाबादेत 24 तासात 43 कोरोना रुग्णांची वाढ, आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर
नागपूरचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरात 450 जण क्वारंटाईन, कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच