प्रकाश आंबेडकर यांना विजयी करू, ‘या’ शिवसेना आमदाराने दिला शब्द

आगामी निवडणुकीबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी अकोला लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी अकोला जिल्हाप्रमुख, आमदार नितीन देशमुख उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर यांना विजयी करू, 'या' शिवसेना आमदाराने दिला शब्द
PRAKASH AMBEDKAR AND UDDHAV THACKAREY
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 7:40 PM

मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत ( उद्धव ठाकरे गट ) युती केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती केली असली तरी ते महाविकास आघाडीसोबत नाहीत. वान्चीमुळे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला होता. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आंबेडकर यांनी कॉंग्रेससोबत येण्याचे आवाहन केले होते. त्यावर त्यांनी ना फोन, ना कबुतर अशी प्रतिक्रिया दिली होती.

लोकसभा निवडणुक जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची लवकरच चर्चा होणार आहे. त्यानंतरच कोणती जागा कुणाला याचा निर्णय होणार आहे. मात्र, त्याधीच प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

आमदार नितीन देशमुख यांनी या बैठकीची माहिती देताना सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोला लोकसभा आणि जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेतला. यावेळी अनेक विषयावर चर्चा झाली. भाजपला पराभूत करायचे असेल तर ही जागा नक्कीच शिवसेनेला मिळावी असे मत आम्ही मांडले असे त्यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात काँग्रेसचा पराभव होत आहे त्यामुळे ही जागा आपल्याकडे असावी. यावेळी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आहेच. पण, त्यांनी केवळ लोकसभेपुरतं राहू नये. विधानसभेलादेखील आपल्यासोबत सोबत राहायला हवं अशी भूमिका मांडल्याचे आमदार देशमुख म्हणाले.

अकोला लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी. जर शिवसेनेला ही जागा मिळणार नसेल आणि येथून वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर लढणार असतील तर आम्ही त्यांनादेखील विजयी करू. कोणत्याही परिस्थितीत भाजपला ही जागा जिंकू देणार नाही असेही आमदार देशमुख यांनी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.