भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची मायावी लखलखती दुनिया, कोरोनामुळं काजवा महोत्सव रद्द
अहमदनगर: लक्ष लक्ष काजव्यांची चमचमती दुनिया बघितली तर आकाशातील तारे जणू धरतीच्या भेटीला आले आहेत असा आभास होतो. काजव्यांचा लयबद्ध चमचमाट सध्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात सुरु आहे. अदभूत , अविश्वसनीय असे हे दृष्य पाहून तुम्हीही नक्कीच चकित व्हाल. खास टीव्ही ९ मराठीच्या दर्शंकांसाठी ही काजव्यांची लखलखती दुनिया पाहण्याची संधी आहे. (Akole Bhandardara Kajawa […]
अहमदनगर: लक्ष लक्ष काजव्यांची चमचमती दुनिया बघितली तर आकाशातील तारे जणू धरतीच्या भेटीला आले आहेत असा आभास होतो. काजव्यांचा लयबद्ध चमचमाट सध्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात सुरु आहे. अदभूत , अविश्वसनीय असे हे दृष्य पाहून तुम्हीही नक्कीच चकित व्हाल. खास टीव्ही ९ मराठीच्या दर्शंकांसाठी ही काजव्यांची लखलखती दुनिया पाहण्याची संधी आहे. (Akole Bhandardara Kajawa Festival cancelled due to corona)
भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया
दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोळटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा ‘बसेरा’ असतो… सध्या कोरोनाच्या संकटामुळे पर्यटकांना ही मेजवानी बघण्यासाठी जाता येत नाही.
तीन वर्षापुर्वी भंडारदरा धरण परिसरात काजवा महोत्सव
गेल्या तीन वर्षापुर्वी भंडारदरा धरण परिसरात काजवा महोत्सव सुरू करण्यात आला. मात्र, कोरोना संकटामुळे पर्यटन स्थळे बंद असल्याने पर्यटक नसल्याने काजवा मोहोत्सव बंद आहे. अनलॉक नंतर पर्यटक काजव्यांची न्यारी दुनिया बघण्यासाठी भंडारदरा परिसरात जातायत मात्र पर्यटकांची संख्या अत्यल्प आहे, अशोक भांगरे या स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं.
काजव्यांची ही चमचम साधारण कॅमेराने शुट करता येत नाही. त्यासाठी विशिष्ठ कॅमेरे आणि तंत्रज्ञानाची गरज असते. गेल्या अनेक वर्षापासून काजव्यांची हि चमचमती दुनिया लोकांपर्यंत पोहचवल्याचा आनंद फोटोग्राफर किरण डोंगरे यांनी व्यक्त केलाय.
अनलॉक नंतर काही प्रमाणात पर्यटकांची वरदळ सुरू झाली असली तरी आदिवासी बांधवांच अर्थकारण ठप्प आहे. पाऊस अधिक पडला तर काजव्यांची ही दुनिया दृष्टीआड होईल. रुग्णसंख्या घटल्याने अहमदनगर जिल्हयात सर्व व्यव्हार सुरू झाले आहेत. पर्यटन स्थळांचे निर्बंध लवकर शिथील करावे, अशी मागणी आदिवासी बांधव करतायत.
खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर, कोणत्या पिकाची MSP सर्वाधिक वाढली?https://t.co/7jawy9Ne01#MSP | #Farmer | #NarendraModi |
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2021
संबंधित बातम्या:
खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर, कोणत्या पिकाची MSP सर्वाधिक वाढली?
कृषिपंपाना त्वरित वीज जोडण्या द्या, एचव्हीडीएस योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करा : नितीन राऊत
Akole Bhandardara Kajawa Festival cancelled due to corona