Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला? गूढ उकलणार? कोर्टाने राज्य सरकारला दिलेला महत्त्वाचा आदेश कोणता?

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने सरकारी वकिलांवर प्रश्नांचा भडिमार केला. आरोपीला बूरखा घातला होता का? आरोपीचे फॉरेन्सिक ठसे आहेत का? आरोपीने रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली की पिस्तुलातून? गोळी घालतानाचं अंतर किती होतं? पॉइंट ब्लॅकवर गोळी झाडली का? असे सवाल आज कोर्टाने सरकारी वकिलांना केले.

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला? गूढ उकलणार? कोर्टाने राज्य सरकारला दिलेला महत्त्वाचा आदेश कोणता?
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने राज्य सरकारला महत्त्वाचा आदेश दिला.
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 2:23 PM

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी कोर्टात धाव घेऊन दाद मागितली आहे. हा एन्काऊंटर फेक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आरोपीच्या वकिलाने तळोजा तुरुंगापासून ते चकमक झाल्याच्या ठिकाणापर्यंतचे सर्व दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य केली असून राज्य सरकारला तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला? याचे गूढ उकलण्यास मदत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबई हायकोर्टात न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी सुरू होती. यावेळी आरोपीचे वकील अमित कटारनवरे यांनी तळोजा तुरुंगापासून ते एन्काऊंटर झाल्याच्या घटनास्थळापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी केली होती. त्यावर कोर्टाने राज्य सरकारला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. आरोपीला तुरुंगातून बाहेर काढल्यापासून ते अक्षयच्या मृत्यूपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवा. आरोपी त्याच्या बॅरेकमधून बाहेर आला, वाहनात चढला, कोर्टात गेला आणि नंतर शिवाजी हॉस्पिटलमध्ये त्याची बॉडी नेण्यात आली. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले तेव्हापासूनचे सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवावेत, अशी आमची अपेक्षा आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. यावेळी कोर्टाने तळोजा कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली. तळोजा कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज सुरू आहेत का? असा सवाल कोर्टाने केला.

पुरावे तकलादू

हे सुद्धा वाचा

जे पुरावे आहेत ते फार तकलादू आहेत. तुमच्या आणि पोलिसांच्या कारवाईवर सर्वसामान्यांच्या मनात भ्रम आहे, असं सांगतानाच आजच्या सुनावणीत तुम्ही जे काही सांगितलं ते आणि पुढच्या सुनावणीतील युक्तिवाद यात तफावत आढळली तर सोडणार नाही, अशी ताकीदच कोर्टाने दिली आहे. पोलीस व्हॅनचा ड्रायव्हर आणि एन्काऊंटरवेळी जे चारजण उपस्थित होते. त्यांचा सीडीआर जमा करा, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

मग चौकशीची गरज काय होती?

अक्षय शिंदेविरोधात एन्काऊंटरच्या दिवशीच चार्जशीट फाईल केली होती. मग त्याची वेगळी चौकशी करण्याची काय गरज होती? या प्रकरणातील पोक्सोमधील आरोपींना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदे मारला गेला, असा दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी गुंतले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी मागणी वकिलाने केली. तर आम्हाला जर काही योग्य वाटलं नाही तर आम्ही योग्य पाऊल उचलणार, असं कोर्टाने म्हटलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.