विदर्भाच्या बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस, कापूस, सोयाबीनची ८० टक्के पेरणी पूर्ण
मागच्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र : मुंबईसह महाराष्ट्रात (maharashtra rain update) मागच्या आठदिवसांपासून मध्यम व हलक्या स्वरुपचा पाऊस सुरु आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर काही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी (farmer news) चिंतेत आहेत. पुढचे चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (ratnagiri red alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाऊस होण्याची शक्यता आहे. रात्रीपासून वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची रिमझिम सुरू आहे. वातावरण ढगाळ असल्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. काही भागात रात्रभर संततधार सुरू होता. लोणार तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. लोणार , खामगाव तालुक्यातील अनेक नद्यांना पूर आला होता. त्याचबरोबर शेतात सुध्दा अधिक पाणी साचलं होतं. लोणार तालुक्यातील अनेक ठिकाणी बंधारे फुटल्याने शेतकऱ्यांची जमिन खरडून गेल्याचं दिसतं आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. कोकण किनारपट्टीपासून केरळ पर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील चार दिवस किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढणार आहे.
विदर्भाच्या बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. खरीपातील पिकांची वाढ सुरु झाली आहे, त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. कापूस, सोयाबीन, खरीप भाजीपाल्याची लागवड जवळपास पूर्ण होत आली आहे. विदर्भात कापूस, सोयाबीनची ८० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
मनमाड परिसरात पावसाची जोरदार हजेरी
नाशिकमध्ये मनमाडसह परिसरात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाअभावी नाशिकच्या पूर्व भागातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या, त्यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. काल रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे.
परभणीच्या पाथरी तालुक्यात मुसळधार पाऊस
परभणीच्या पाथरी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून मागच्या काही दिवसांपासून झो़डपून काढले आहे. तालुक्यातील उमरा, गुंज, बाभळगाव, तुरा, मसला या तालुक्यात मागच्या काही दिवसात चांगलाचं पाऊस झाला आहे. काल चांगला पाऊस झाल्याने अनेक पूलांवरुन पाणी गेलं आहे.