क्रिकेटपटूला दणका देणारे अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, तर रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडे नागपूरची धुरा

राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बढती झाली असून त्यांच्या जागी नागपूरचे पोलील आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. अमितेश कुमार यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. इतरही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदल्या करण्यात आल्या आहेत.

क्रिकेटपटूला दणका देणारे अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, तर रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडे नागपूरची धुरा
ips amitesh kumarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 9:57 PM

मुंबई | 31 जानेवारी 2024 : वेस्ट इंडीजच्या क्रिकेट पटूला घरी बसविणारे अमितेश कुमार यांची पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. अमितेश कुमार नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून सप्टेंबर 2020 पासून कार्यरत होते. नागपूरचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून रविंद्र कुमार सिंगल यांची नियुक्ती झाली आहे. तर पुणे शहराचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची होमगार्डचे महासमादेशक म्हणून बढती झाली आहे. राज्यातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढत्या करण्यात आल्या आहेत.

1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले अमितेश कुमार यांची पुणे शहर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी सर्वाधिक काळ नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून काम करण्याचा विक्रम केला आहे. साल 2007 मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा क्रिकेट सामना सुरु असताना वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मरलोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहीमचा हस्तक मनोज कोचर यांच्या संभाषण रेकॉर्ड करून क्रिकेट जगात खळबळ माजविली होती. या कामगिरीमुळे अमितेश यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. अमितेश कुमार यांनी औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर ) शहराचे पोलिस आयुक्त म्हणून तर मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणूनही काम केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते.

रितेश कुमार होमगार्डचे महासमादेश

पुण्याचे पोलिस आयु्क्त असलेल्या रितेश कुमार यांची होमगार्डचे महासमादेश म्हणून बढती करण्यात आली आहे. होमगार्डचे अपर पोलिस महासंचालक आणि उप महासमादेशक असलेले प्रभात कुमार यांची नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्यचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहआयुक्त असलेल्या शिरीष जैन यांची राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त म्हणून बढती झाली आहे. महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पांडे यांची महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक म्हणून बढती झाली आहे.

प्रवीण पवार पुणे शहर पोलीस सह आयुक्त

कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची पुणे शहर पोलीस सह आयुक्त म्हणून निवड झाली आहे. पंकज देशमुख पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक झाले आहेत. निसार तांबोळी यांची राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये सहआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. एटीएसमध्ये विशेष पोलीस निरीक्षक असणारे ए. डी. कुंभारे यांची मुंबई वाहतूक विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त निवड झाली आहे. चंद्रकिशोर मीना एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून तर आरती सिंह यांची राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून नियुक्ती झाली आहे.

पद आणि कंसात नेमणूकीचे ठिकाण खालील प्रमाणे :

दत्तात्रय कराळे ( नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक ), संजय शिंदे ( पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ), प्रवीण कुमार पडवळ ( विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण आणि खास पथके ), संजय दराडे ( कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक ), ज्ञानेश्वर चव्हाण ( ठाणे शहराचे पोलिस सह आयुक्त ), एस.डी. एनपुरे ( नवीमुंबई पोलिस सह आयुक्त ) , एन.डी. रेड्डी ( पोलिस आयुक्त, अमरावती शहर ), संदीप पाटील ( नक्षल विरोधी अभियान, नागपूर, विशेष पोलिस महानिरीक्षक ), विरेंद्र मिश्रा ( विशेष पोलिस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र ), रंजन कुमार शर्मा ( आर्थिक गुन्हे शाखा पुणे, विशेष महानिरीक्षक ), नामदेव चव्हाण ( राज्य राखीव बल नागपूर, विशेष पोलिस महानिरीक्षक ), राजेंद्र माने ( सह संचालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी ), विनिती साहु ( अपर पोलीस आयु्क्त, संरक्षण आणि सुरक्षा, बृहन्मुंबई ) , एम. राजकुमार ( पोलिस आयुक्त, सोलापूर शहर), अंकित गोयल ( पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र ), बसवराज तेली ( पुणे, गुन्हे अन्वेषण विभाग, पोलिस उप महानिरीक्षक), शैलेश बलकवडे ( अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर), शहाजी उमाप ( विशेष शाखा, मुंबई, अपर पोलिस आयुक्त ) एस.जी. दिवाण ( पोलिस उप महानिरीक्षक, पोलिस दळणवळण आणि माहीती तंत्रज्ञान, पुणे ), संजय शिंत्रे ( पोलिस उप महानिरीक्षक, दक्षता आणि वस्तू सेवा कर विभाग ) आदी अधिकाऱ्यांची बढती आणि बदल्या झाल्या आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.