कोरोना नियम मोडल्यास महापौरांवरही कारवाई करा; अमोल कोल्हे यांची मागणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक सूचना केल्या आहेत. (amol kolhe demand action against mayor if breach covid rules)

कोरोना नियम मोडल्यास महापौरांवरही कारवाई करा; अमोल कोल्हे यांची मागणी
खासदार अमोल कोल्हे
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 4:20 PM

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक सूचना केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे नियम मोडल्यास सर्व सामान्यांवर जशी कारवाई केली जाते, तशीच कारवाई महापौरांवरही करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही मागणी केली आहे. (amol kolhe demand action against mayor if breach covid rules)

अमोल कोल्हे यांनी ट्विट करून महापौरांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी आपले पूर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध जाहिर केले. हे लक्षात घेता, कोरोनाचे नियम मोडल्यावर प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेवर कारवाई होते, तशीच कारवाई महापौरांवरही व्हायला हवी, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या महापौरांकडून ‘फॅशन शो’चे आयोजन

अजित पवार यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याच दिवशी सायंकाळी सोशल माध्यमातून जनतेशी संवाद साधला. हे सर्व असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या महापौर माई ढोरे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाकडे सपशेल दुर्लक्ष करत ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. हे अतिशय खेदजनक आहे. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाविषयी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापौरांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या नेत्यांचे दौरे रद्द

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. नागरिकांची गर्दी होऊ नये आणि कोरोना नियमांचं पालन केलं जावं यासाठी त्यांनी हे दौरे रद्द केले आहेत. (amol kolhe demand action against mayor if breach covid rules)

संबंधित बातम्या:

Pimpri Corona | फॅशन शोच्या कार्यक्रमात तुफान गर्दी, महापौर माई ढोरेंकडून कोरोना नियमांना हरताळ

लोकलच्या फेऱ्या कमी होणार का, मुंबईत लॉकडाऊन होणार? पालकमंत्री अस्लम शेख म्हणतात…..

संजय राठोड हत्यारा, स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल 

VIDEO: मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलीय, आता बदनामी थांबवा; संजय राठोडांनी हात जोडले

(amol kolhe demand action against mayor if breach covid rules)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.