अजित पवार गटातील बड्या नेत्याला खासदार अमोल कोल्हे यांची ऑफर, आमच्याकडे या…खासदार करतो
Ajit Pawar and Amol kolhe Nilesh Lanke | अजित पवार आणि शरद पवार गटात आता तीव्र टीकाटिप्पणी होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात सामना रंगला आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे.
अहमदनगर | दि. 5 मार्च 2024 : लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. सर्वच जण दमदार लोकांसाठी आपल्या पक्षाची दारे उघडी करत आहेत. निवडणूक जिंकून देणाऱ्या व्यक्तींसाठी राजकीय पक्षांकडून पायघड्या घातल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहे. अजित पवार आणि शरद पवार गटात आता तीव्र टीकाटिप्पणी होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात सामना रंगला आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचवेळी अमोल कोल्हे अजित पवार यांच्या लोकांना आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न करत आहेत.
निलेश लंके यांना खुली ऑफर?
अजित पवार गटातले आमदार निलेश लंके यांची शरद पवार यांच्यांशी जवळीक वाढू लागल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचवेळी निलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी खुली ऑफर दिली आहे. अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. चार दिवस चाललेले या महानाट्याच्या समारोप कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांना शरद पवारांसोबत येण्याचं ऑफर दिलीय.
काय म्हणाले अमोल कोल्हे
तुतारी घेऊन नगर दक्षिण मतदार संघात लढण्याचा आवाहन अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना केले आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं, असे कोल्हे यांनी म्हटलंय. तर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षि मध्ये वाजवलीच पाहिजे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
निलेश लंके यांच्या सामाजिक कामाचा मला कायमच अभिमान वाटतो कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील माणसं जनतेच्या काळजावर अभिराज्य गाजवतात तेव्हा त्यांचा अभिमान सर्वांनाच वाटतो, अशा भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्याय. तर या नाटकाने काय प्रेरणा दिली तर महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तक्ता पुढे झुकत नाही आणि झुकणार नाही, असे कोल्हे यांनी म्हटलंय.