अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 वर, पहिल्या मृत व्यक्तीच्या संपर्कातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही चारवर पोहोचली आहे. यामुळे अमरावतीतील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले (Amravati Corona Positive) आहे.

अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 वर, पहिल्या मृत व्यक्तीच्या संपर्कातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Apr 08, 2020 | 9:22 AM

अमरावती : अमरावतीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या तिघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह (Amravati Corona Positive) आला आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही चारवर पोहोचली आहे. यामुळे अमरावतीतील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या आठवडाभरात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत (Amravati Corona Positive) आहे. अमरावतीत 2 एप्रिलला एका कोरोनाबाधित व्यक्तीचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 24 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील तिघांचे कोरोना रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट आकडा चारवर गेला आहे. या सर्वांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अमरावीतील एका खासगी रुग्णालयात 2 एप्रिलला एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला न्युमोनिया झाल्याचे खासगी डॉक्टरांना सांगितले होते. मात्र रुग्णाला श्वसनक्रियेत अडथळे येत होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

यानंतर अमरावती शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी दक्षतेचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी, न्युमोनियाचे निदान झालेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

दरम्यान मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोनाचा फैलाव वाढला आहे. मुंबईत आतापर्यंत 642 जणांना कोरोनाची लागण लागण झाली आहे. तर राज्यात 1 हजार 018 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यत मुंबईत 40 आणि राज्यात 64 जणांचा मृत्यू झाला (Amravati Corona Positive) आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.