VIDEO : जुन्या रागाचा वचपा काढण्यासाठी बारजवळच राडा, धुलिवंदनालाच तरुणाला बेदम मारहाण

अमरावतीत धुलिवंदनाच्या सणाला गालबोट लागलं आहे. (Amravati Six People beaten one person to take revenge)

VIDEO : जुन्या रागाचा वचपा काढण्यासाठी बारजवळच राडा, धुलिवंदनालाच तरुणाला बेदम मारहाण
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 11:17 AM

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच ठिकाणी साध्या पद्धतीने धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे अमरावतीत धुलिवंदनाच्या सणाला गालबोट लागलं आहे. अमरावतीत धुलिवंदनाच्या दिवशी जुन्या वादातून राडा झाला आहे. यात सहा जणांनी एका युवकाला बेदम मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. (Amravati Six People beaten one person to take revenge)

जुन्या रागाचा वचपा काढण्यासाठी मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, एका जुन्या वादातून धुलिवंदनाच्या दिवशी हा राडा झाल्याचे बोललं जात आहे. भूषण पोहोकार (21) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. अमरावती शहरातील नवसारी जवळील यश बारजवळ भूषण रस्त्याने जात होता. त्यावेळी जुन्या रागाचा वचपा काढण्यासाठी 6 जण दबा धरुन बसले होते. त्यांनी भूषणला पकडून लाथा-बुक्क्यांसह काठीने जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत भूषण गंभीर जखमी झाला.

तरुणाची मृत्यूशी झुंज

काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. सध्या भूषण हा मृत्यूशी झुंज देत आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यातील जखमी तरुण आणि मारेकरी हे दोघेही गुंडगिरी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

सध्या जखमी तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. तर एक जण पसार झाला आहे. यातील 4 युवक अल्पवयीन आहे. या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Amravati Six People beaten one person to take revenge)

संबंधित बातम्या : 

डोकं फुटलेल्या अवस्थेत तरुण पोलीस स्टेशनला, औरंगाबादेत कॉन्स्टेबलने तक्रारदारालाच धुतलं

म्हशीच्या दुधावरुन राईचा पर्वत, प्रचंड गदारोळ, वाद विकोपाला, अक्षरक्ष: गोळीबार

बॉयफ्रेंडची हत्या केल्याने तरुणीला जन्मठेपेची शिक्षा, मात्र ‘या’ कारणामुळे शेकडो महिला समर्थनासाठी रस्त्यावर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.