युक्रेनमधील 250 विद्यार्थी रोमानियात दाखल, कुणी व्यवस्था केली? वाचा सविस्तर

युक्रेन मधील भारतीय दुतावासाने चर्नोवस्की व त्या आसपासच्या भागातील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना बसच्या साह्याने रोमानिया विमानतळावर नेण्यात आल्याची माहिती मूळ अमरावती येथील साहिर प्रसेनजित तेलंग या विद्यार्थ्याने दिली.

युक्रेनमधील 250 विद्यार्थी रोमानियात दाखल, कुणी व्यवस्था केली? वाचा सविस्तर
विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी हलचाली वाढल्या
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 10:52 PM

अमरावतीरशियाने युक्रेनवर  (Russia Ukraine War) हवाई हल्ले केल्याने युक्रेनमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. रशियाने युक्रेनचे अनेक एअरपोर्ट (Ukraine Airport) सुद्धा आपले टार्गेट केले आहेत. युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत. या परिस्थितीमुळे भारतीय पालकांना मोठी चिंता वाटायला लागली आहे. मात्र युक्रेन मधील भारतीय दुतावासाने चर्नोवस्की व त्या आसपासच्या भागातील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना बसच्या साह्याने रोमानिया विमानतळावर नेण्यात आल्याची माहिती मूळ अमरावती येथील साहिर प्रसेनजित तेलंग या विद्यार्थ्याने दिली व युक्रेन व रोमानिया विमानतळावरील काही दृश्य पाठवली आहेत.जवळपास 250 च्यावर भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान दिल्लीला येणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व व्यवस्था भारतीय दुतावासाने व भारत सरकारने केलेली आहे. यामुळे पालकांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.अमरावती येथील 8 विद्यार्थी युक्रेनमधे अडकले आहेत.

नवनीत राणा यांचा फोनवरून संवाद

रशिया आणि युक्रेन या दोन देशामध्ये सध्या युद्ध सुरू असल्याने तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे युक्रेन मध्ये राहणारे भारतीय विद्यार्थी हे मायदेशी परतण्यासाठी प्रयत्न करत आहे.मूळचा अमरावतीच्या तिवसा शहरातील राहणार तुषार गंधे हा देखिल युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. भारतात येण्यासाठी त्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याशी फोन वर संवाद साधत मदतीची मागणी केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी देखील लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. त्यासाठी काही हेल्पलाईन जारी करण्यात आल्या आहेत.

कसा संपर्क साधाल?

शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल 1 हजार 200 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकल्याची माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याकडून देण्यात आली आहे. यातील 300 विद्यार्थ्यांचा आपल्या पालकांशी संपर्क झाल्याचंही सरकारने सांगितलं. तसंच यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी राज्य सरकारकडून हेल्पलाईनही जारी करण्यात आलीय. राज्यातील अंदाजे 1 हजार 200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत, त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात ‘राज्य नियंत्रण कक्ष’ असून विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. तसंच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती राज्याचा नियंत्रण कक्ष 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर द्यावी. तसेच जिल्हास्तरावर देखील हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलेले आहेत, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

Russia Ukraine War : महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले, 300 विद्यार्थ्यांशी संपर्क; राज्य सरकारकडून हेल्पलाईन जारी

Russia Ukraine Crisis : यूक्रेनमध्ये सत्तापालट? सत्ता तुमच्या हातात घ्या, ब्लादिमीर पुतिन यांचं यूक्रेनच्या सैन्याला आवाहन

जगातील या 5 देशांची आर्मी आहे सर्वात भयंकर ,भारतीय सेना आहे या क्रमांकांवर !

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.